Femina Miss India 2019 Final Live Streaming and Telecast: कोण होणार नवी भारताची सुंदरी? या ठिकाणी ऑनलाईन पाहू शकाल देशातील सर्वात मोठी सौंदर्यस्पर्धा
Femina Miss India 2019 Contestants (Photo Credits: @feminamissindia/ Twitter)

यंदा, मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इंडोर स्टेडियममध्ये (Sardar Vallabhbhai Patel Indoor Stadium), आज, म्हणजेच 15 जून रोजी फेमिना मिस इंडिया 2019 (Femina Miss India 2019) सौंदर्यस्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. सेन्को गोल्ड अँड डायमंड्स यांच्या, रजनीगंधा सिल्व्हर पर्ल्स ज्वेलरी आणि SEPHORA द्वारा संचालित हा या वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित इव्हेंट असणार आहे. 2018 ची मिस इंडिया अनुक्रीती व्यास (Anukreethy Vyas), ही आज आपला मुकुटू नव्या सुंदरीला घालण्यास सज्ज आहे. हा ग्रँड फिनले कलर्स चॅनलवर (Colors Channel) रात्री 8.00 वाजता प्रसारित केला जाणार आहे.

कलर्ससोबतच आपण हा इव्हेंट जियो टीव्ही (Jio TV) अॅपवरही थेट पाहू शकता. फेमिना मिस इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलला भेट देऊन, आपण सर्व Fbb Femina Miss India 2019 ग्रँड फिनालेचे अपडेट्स देखील मिळवू शकता. ही स्पर्धा फार मोठी आणि प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धा असल्याने आयोजकांनी ही स्पर्धा चॅनेलवर प्रसारित करण्यासोबतच थेट प्रसारणासाठी ऑनलाइन व्यवस्था केली आहे. (हेही वाचा: Miss World 2018: आज जगाला मिळणार नवी विश्व सुंदरी; Anukreethy Vas कडे भारतीयांचे लक्ष)

या स्पर्धेत 30 राज्यातील युवती सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत जिंकणारी युवती मिस वर्ल्ड 2019 (Miss World 2019) मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. तर दोन उपविजेते मिस ग्रँड इंटरनॅशनल 2019 (Miss Grand International 2019) आणि मिस युनायटेड कॉन्टिनंट 2019 (Miss United Continents 2019) मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करतील.