February 2019 Calendar: 2019 चा दुसरा महिना फेब्रुवारी (February) सुरु होत आहे. 28 दिवसांचा हा महिनाही काही व्रत वैकल्यामुळे खास ठरणारा आहे. या महिन्याची सुरुवात तीळ द्वादशी (Til Dwadashi) पासून होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मौनी अमावस्या (Mauni Amavasya) देखील येणार आहे. हिंदू धर्मात या अमावस्येचे फार महत्व आहे, या दिवशी स्नान आणि दानाचे फार महत्व आहे. याच महिन्यात गुप्त नवरात्रि (Gupt Navratri) देखील सुरु होत आहे. तर अशाप्रकारे हा महिनाही अनेक व्रतांनी भरलेला आहे, चला पाहूया संपूर्ण यादी
1 फेब्रुवारी 2019 (शुक्रवार)- तिळ द्वादशी
2 फेब्रुवारी 2019 (शनिवार)- प्रदोष व्रत, शनि प्रदोष
4 फेब्रुवारी 2019 (सोमवार)- मौनी अमावस्या. दर्श अमावस्या
5 फेब्रुवारी 2019 (मंगळवार)- गुप्त नवरात्री प्रारंभ
8 फेब्रुवारी 2019 (शुक्रवार)- विनायक गणेश चतुर्थी व्रत
10 फेब्रुवारी 2019 (रविवार)- वसंत पंचमी, सरस्वती पूजा
12 फेब्रुवारी 2019 (मंगळवार)- रथ सप्तमी, नर्मदा जयंती
13 फेब्रुवारी 2019 (बुधवार)- भीष्म अष्टमी, मासिक दुर्गाष्टमी
14 फेब्रुवारी 2019 (गुरुवार)- महानंदा नवमी, गुप्त नवरात्रि संपन्न
(हेही वाचा: प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यात क्रुजचा आनंद घ्या, जाणून घ्या किंमत)
16 फेब्रुवारी 2019 (शनिवार)- जया एकादशी व्रत – वैष्णव, भीष्म द्वादशी
19 फेब्रुवारी 2019 (मंगळवार)- माघ पूर्णिमा, गुरु रविदास जयंती, ललिता जयंती
20 फेब्रुवारी 2019 (बुधवार)- फाल्गुन प्रारंभ, अट्टुकल पोंगल
22 फेब्रुवारी 2019 (शुक्रवार)- संकष्टी गणेश चतुर्थी व्रत
24 फेब्रुवारी 2019 (रविवार)- यशोदा जयंती
25 फेब्रुवारी 2019 (सोमवार)- शबरी जयंती
26 फेब्रुवारी 2019 (मंगळवार)- जानकी जयंती, कालाष्टमी
28 फेब्रुवारी 2019 (गुरुवार)- महर्षि दयानंद सरस्वती जयंती
फेब्रुवारी महिन्यातीलच मौनी अमावस्येच्या दिवशीच कुंभमेळ्यातील दुसरे शाही स्थान पार पडणार आहे, यामुळे देखील हा महिना खास ठरणार आहे.