मुलींनो ! कलेक्शनमध्ये जरुर असू द्या या '४' प्रकारच्या बॅग्स !
करिना, कंगना, दीपिक (Photo Credit- Instagram)

कपडे, मेकअपशिवाय मुलींना काय भावत असेल तर ते म्हणजे बॅग्स. वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगाच्या स्टायलिश बॅग्स मुलींना आवडतात. त्यांचे खूप कलेक्शन करावे असेही वाटते. पण अनेकदा आवडीच्या आणि कलेक्शनच्या नादात मुळ गरज राहून जात नाहीये ना? हे एकदा पाहायला हवे. कारण खूप बॅग्स घेतल्या मग त्या ठराविक प्रसंगात वापरता येणार नसल्या तर? म्हणून या चार प्रकारच्या बॅग्स तुमच्या कलेक्शनमध्ये जरुर असू द्या. या बॅग्स तुम्हाला फायदेशीरही ठरतील आणि स्टायलिश लूकही देतील...

वेस्ट बॅग

या बॅग्स प्रवासात खूप फायदेशीर ठरतात. प्रवासादरम्यान यात तुम्ही गरजेच्या वस्तू ठेवू शकता. पैसे, आयकार्ड, वाईप्स, फोन यांसारख्या अत्यावश्यक वस्तू वेस्ट बॅगमध्ये अगदी सहज ठेवू शकतो. त्यामुळे त्या पटकन मिळतात. ही बॅग तुम्ही कंबरेला बांधू शकता. त्याचबरोबर दिसायलाही अतिशय स्टायलिश दिसते.

बॅगपॅक

या बॅगेत तर तुमचं संपूर्ण जग सामावेल. म्हणजेच लहानशा ट्रिपवर जात असाल तर ही बॅग अतिशय फायदेशीर ठरेल. यात तुम्ही काही कपडे, मेकअप किट, फोन, औषधे, डबा आणि पाण्याची बॉटल अगदी सहज राहील.

टोट/लांब बेल्ट असलेली बॅग

लांब स्ट्रॅप असलेल्या बॅगची खासियत म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यात फेरबदल करु शकता. शॉपिंगला किंवा ऑफिसला जात असला तर बेल्ट लावा आणि लांब ठेवा. पार्टीला जाताना तुम्ही याचा बेल्ट काढूनही ही बॅग वापरु शकता.

क्लच

कॉकटेल पार्टीसाठी जाताय आणि सोबत जास्त वस्तू कॅरी करण्याची गरज नसल्यास क्लचचा पर्याय अगदी उत्तम आहे. शक्य असल्यास दोन प्रकारचे क्लच कलेक्शनमध्ये ठेवा. एक लेदर क्लच आणि एक स्टोन, मिरर असलेले क्लच. लेदर लूकचे क्लच तुम्ही वेस्टन वेअरवर कॅरी करु शकता. तर वर्क असलेले क्लच एथनिक वेअरवर सूट करेल.