Gold Face Treatment Video: जगप्रसिद्ध मॉडेल बेला हदीद हिने केली 24K शुद्ध सोन्याने गोल्ड फेस ट्रीटमेंट; पाहा किती आला खर्च?
Bella Hadid | (Photo Credits: Instagram)

बेला हदीद. आंतरराष्ट्री मॉडेलिंग क्षेत्रातमध्ये बरंच वजनदार आणि लोकप्रिय नाव. बेला हदीद (Bella Hadid) ही यशस्वी मॉडेल तर आहे. शिवाय ती जगातील सर्वात सुंदर मॉडेलपैकीही एक आहे. त्यामुळे सहाजिकच तिच्यावर जगभरातील प्रसारमाध्यमांच्या नजरा असतात. बेला हदीद स्वत:ही अनेक गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकतीच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळी ती चर्चेत येण्याचे कारण ठरली आहे गोल्ड फेस ट्रीटमेंट (Gold Face Treatment). होय, बेला हदीद हिने आपल्या चेहऱ्यावर 24 कॅरेट शुद्ध सोन्याने (24K Pure Gold) एक ट्रीटमेंट केली आहे. ज्याला गोल्ड फेस ट्रीटमेंट म्हणतात. सोशल मीडियावर तिच्या या ट्रीटमेंटची जोरदार चर्चा आहे. ही ट्रीटमेंट घेतानाचा बेला हदीद हिचा एक व्हिडिओही (Gold Face Treatment Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mimi Luzon नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर बेला हदीद हिचा गोल्ड ट्रिंटमेंट घेतानाचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मिमी हे ही एक सेलेब्रिटी एस्थेटटिशन आहे. जी ब्यूटी ट्रीटमेंट साठी जगप्रसिद्ध आहे. मिमीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत बेला हदीद हिच्यावर गोल्ट फेस ट्रिंटमेंट सुरु असल्याचे पाहायला मिळते. (हेही वाचा,Model Nikita Gokhale Hot Photo: मॉडेल निकिता गोखले हिने 'शांतता म्हणजे महान सामर्थ्याचा स्रोत' ही पंचलाईन वापरत शेअर केला न्यूड फोटो )

इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

Angelic @bellahadid ⚡️ dripping in gold with 24K Pure Gold Mask Treatment #glowbymimiluzon

A post shared by Mimi Luzon (@mimiluzon) on

इन्स्टाग्राप पोस्ट

 

View this post on Instagram

 

Night at the museum @brandonmaxwell

A post shared by Bella 🦋 (@bellahadid) on

इन्स्टाग्राम पोस्ट

सांगितले जाते की, गोल्ड फेस ट्रिंटमेंट केल्याने चेहऱ्यावर ग्लो वाढतो आणि त्याच्या वाढण्याचा वेगही अधिक असतो. अल्पावधीतच त्याचा परिणाम दिसू लागतो. चेहऱ्यावरचा ग्लो वाढावा अशा पद्धतीनेच या ट्रीटमेंट ची रचना केली जाते असे सांगतात. लेटेस्टली मराठी अशा कोणत्याही ट्रीटमेंट ची पुष्टी करत नाही. तसेच, अशी कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असा सल्ला देते. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गोल्ड फेस ट्रीटमेंट करण्यासाठी 350 डॉलर ते 1100 डॉलर पर्यंत खर्च येतो. यात फएस मास्क कोस्ट प्रत्येक फेम मास्कवर अवलंबून असते.