Diwali Special: पारंपारिक पैठणींचा एथनिक लूक ! 'या' अभिनेत्रींचे ड्रेस पाहून तुम्हीही पुन्हा पैठणींच्या प्रेमात पडाल
पारंपारिक पैठणींचा एथनिक लूक Photo Credits : Instagram

पैठणीला महाराष्ट्रात महावस्त्राचा मान आहे. काळानुरूप पैठणीमध्ये बदल करण्यात आले आहे. मराठमोळ्या स्त्रीला तिच्या ठेवणीच्या साड्यांमध्ये पैठणी साडी असावी असं वाटतंच. धकाधकीचा प्रवास करून कामाच्या ठिकाणी पोहचावे लागत असल्याने किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणार्‍या अनेकींना पैठणी साडी नेसणं शक्य नसतं किंवा प्रवास करणं कठीण असतं. अशावेळेस दूधाची तहान ताकावर भागवणं म्हणजे पैठण्या साड्या तुम्ही ड्रेसच्या स्वरूपात घालू शकता.

आजकाल बाजारात साड्यांप्रमाणेच पैठणी साड्यांमधील ड्रेस पिस देखील उपलब्ध आहेत. किंवा तुमच्या आईच्या, आजींच्या जुन्या पैठणी साड्यांना तुम्ही नवा लूक देऊ शकता. आजकाल इंडो वेस्टर्न स्टाईल ट्रेंडमध्ये आहे. जुन्या भराजरी साड्या नेसणं शक्य नसतं तेव्हा त्यांना ड्रेस किंवा वनपिसलूकमध्ये रूपांतरीत करून नेसू शकता.

मराठमोठ्या अनेक अभिनेत्रींचे असेच इंडो वेस्टर्न लूक प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काहींनी पैठणी साड्यांना

ड्रेसमध्ये रूपांतरीत केलं आहे.

1. अभिज्ञा भावे

अभिनेत्री अभिज्ञा भावे कॅमेर्‍यासमोर उत्तम कलाकार आहे तितकीच तिची कमाल कॅमेर्‍यामागेही आहे. 'तेजाज्ञा' या ब्रॅन्डखाली तेजस्विनी पंडितसोबत पारंपारिक साड्यांना नव्या अंदाजात पुन्हा ट्रेन्डमध्ये आणण्याचं काम अभिज्ञा करत आहे.

2. मयुरी देशमुख

अभिनेत्री मयुरी देशमुखचाही हा पैठणीतील इंडो वेस्टर्न लूक कमालीचा व्हायरल झाला होता.

3. अक्षया देवधर

अभिनेत्री अक्षया देवधरनं पैठणीच्या स्वरूपातीला हा वनपीस नुकताच एका अवॉर्ड शोमध्ये परिधान केला होता.

4. मृण्मयी देशपांडे

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनी एका कार्यक्रमामध्ये नुकताच हा पैठणीच्या बॉर्डरचा ड्रेस घातला होता.

दिवाळी हा भारतीयांचा सर्वात मोठा सण आहे. दिवाळीमध्ये 5 दिवस नेहमीच वेगवेगळं सेलिब्रेशन होत असतं. मग यंदा एव्हरग्रीन फॅशन असलेल्या पैठणीला नव्या स्वरूपात घालून पहा. पैठणी ही दिसायला रूबाबदार आणि वजनाला हलकी फुलकी असल्याने तुम्ही सहज त्यामध्ये वावरू शकता.