Bearded Woman Harnaam Kaur: दाढीवाली महिला हरिनाम कौर हिच्याबद्दल आपल्याला माहिती आहे का?
Bearded Woman Harnaam Kaur | (Photo- Instagram)

दाढीवाले पुरुष (Bearded Men) म्हणजे एक सर्वसामान्य बाब. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत एखाद्या महिलेच्याही हनुवटीवरती बारकशी दाढीसदृश्य लव आपण पाहिली असेल. पण, एखाद्या महिलेच्या चेहऱ्यावर जर अस्ताव्यस्त पसरलेली लांबच लांब दाढी आणि मिशी असेल तर? सहाजिकच सर्वांच्या नजरा वळल्या जातील. इंटरनेट आणि सोशल मीडियावर एक दाढीवाली महिला (Bearded Woman) अशीच सर्वांची नजर वेधून घेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच ती चर्चेचा विषय ठरते. हरिनाम कौर (Harnaam Kaur) असे या महिलेचे नाव आहे. पुरुषांनाही फिकी पाडेल अशी घनदाट आणि लांबच लांब अशी दाढी हरिनाम कौर (Bearded Woman Harnaam Kaur) आहे.

हरिनाम कौर हिच्याबाबत सांगितले जाते की, ती जगातील 14 विशेष महिलांपैकी एक आहे. ज्या महिलाच असतात परंतू त्यांचे शरीर पुरुषांसारखे असते. हरिनाम कौर ही सध्या इंग्लंडमध्ये राहते. दाढी ही तिच्या व्यक्तीमत्वातील विशेषत: आहे. जगभरातील विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्येही तिच्या दाढीची नोंद आहे. आपल्या दाढीमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरते. परंतू, त्याशिवाय ती एक चंगली मोटिवेशनल स्पीकरही आहे. त्यामुळे लोक तिला पाहण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. तसेच, तिच्यासोबत फोटोही काढतात. (हेही वाचा, पुरुषांच्या दाढीत असतात कुत्र्यांपेक्षा जास्त घातक बॅक्टेरिया; ठरू शकतात आजारपणाचे कारण)

Bearded Woman Harnaam Kaur | (Photo- Instagram)

हरिनाम कौर ही आज भलेही एक यशस्वी महिला म्हणून ओळकली जात असेल. दाढी ही तिची खास ओळख बनली असेल. परंतू, एक काळ असा होता की लोकांच्या हेटाळणीचा तिला जोरदार सामना करावा लागत असे. कारण हरिनाम कौर हिची दाढी हा लोकांच्या चेष्टेचा विषय होता. तिला आपली दाढी ही कमजोरी वाटत असे. पण आता हीच कमजोरी तिने ताकतीत परावर्तीत केली आहे.

ट्विट

वैद्यकीय भाषेत सांगितले जाते की हरिनाम कौर हिला वयाच्या बाराव्या वर्षी 'पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम' नावाचा एक आजार होता. ज्यामुळे तिच्या शरीरावर केस हे इतर मुलींच्या तुलनेत अधिक वेगाने वाढत. मुलांप्रमाणे तिला चेहऱ्यावर दाढीही आली. दाढीमुळे तिला खूपच अपमानास्पद वागणूक मिळाली. शाळेत, समाजात तिचे मित्र, लोक तिची खिल्ली उडवत असत. यात तिच्या जवळच्या लोकांचाही समावेश असे.

Bearded Woman Harnaam Kaur | (Photo- Instagram)

आपली दाढी आणखी वाढू नये यासाठी तिने अनेक उपाय केले. अनेक सर्जरी करणयाचा प्रयत्न केला. क्रीमही वापरल्या. परंतू काही फायदा झाला नाही. शेवटी थकलेल्या हरिनाम कौर हिने दाढी थांबविण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि चक्क दाढी वाढविण्याचा निर्णय घेतला. आता तिने दाढी ही तिच्या आयुष्याचा भाग म्हणून स्वीकारली आहे. आज त्याच दाढीमुळे ती सोशल मीडियावर स्टार आहे. अनेक मोठे अॅक्टर्सही तिचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करतात.