Crocodile Attack Man Viral Video: मगर पकडायला गेला, मगरमिठीत अडकला; थोडक्यात वाचला बापुडा (पाहा व्हिडिओ)
Crocodile Attack on Man | (Photo Credit: Reddit )

वन्य, जलचर, अथवा भूजलचर प्राण्यांवर तुमचे कितीही प्रेम असले तरी त्यांच्याशी नको तितकी केलेली लगट कधीही अंगाशीच येते. असाच काहीसा धक्कादायक प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. हा व्यक्ती चक्क मगरीवरच नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होता. मगरीसोबत केलेली मस्ती त्याच्या अंगाशीच आली (Crocodile Attack Man Viral Video) होती. परंतू, तो थोडक्यात वाचला. मगरीच्या जबड्यात जाता जाता तो बालंबाल बचावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर ( Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती शर्ट सारख्या दिसणाऱ्या साध्या कापडाच्या सहाय्याने मगरीला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओतील दृश्य पाहायाल आणि विचित्र आणि भितीदायक वाटते. मगर या मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्याला पकडण्याच्या कृतीत तो माणूस (व्हिडिओतील) कुशल आणि आत्मविश्वासू असल्याचे सुरुवातीला दिसत होते. परंतू, थोड्याच वेळात हा कुणी कुशल मनुष्य नव्हे तर एक सर्वसाधारण थोतांड व्यक्ती असल्याचे दिसते. मगरीने हालचाल करताच तिला पकडणारा हा म्हातारा अनियंत्रितपणे जमिनीवर पडताना दिसत होता. त्याने मागे जाण्याचा प्रयत्न केला आणि मगरीच्या धोकादायक हल्लेखोर हालचाली पाहून तो काहीला घाबरला. एक क्षण तर असा आला की आता मगर त्याला जबड्यात धरुन खाणार की काय, पण तो आणखी मागे सरला आणि धोका टळला.

दरम्यान, मगरूच्या तोंडात वृद्धाचा हात थोडक्यात अडकला. पण, कसे कोणासठाऊक मगरीने ताबडतोब आपले तोंड उघडले आणि त्या माणसाला सोडून दिले. त्यामुळे तो गृहस्थ स्वत:ला इजा न होता वाचवू शकला. प्राण्यांचा अभ्यास आणि योग्य प्रशिक्षण असल्याशिवाय कोणत्याही मानवेत्तर जीवाशी न खेळणेच योग्य, याचे उत्तम उदाहरण ठरावा असाच हा व्हिडिओ आहे. (हेही वाचा, नाशिक: पहाटे व्यायामासाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला; जागीच मृत्यू)

व्हिडिओ

हा व्हिडिओ Reddit वर एका युजरने शेअर केला आहे. हा धक्कादायक व्हिडिओ अनेकांनी असंख्य वेळा पाहिला आहे. व्हिडिओ पाहून एका युजरने लिहिले आहे, शर्ट फेकला तेव्हा हा व्यक्ती प्रशिक्षीत वाटत होता. पण, पुढे तसे काहीच दिसले नाही. केवळ नशिबानेच हा व्यक्ती वाचला नाहीतर मगर त्याला खातच होती, असे एका युजरने म्हटले आहे.