आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरामदायी झोप मिळणे खूप कठीण झाले आहे. पण उत्तम आरोग्यासाठी पुरेशा झोपेची नितांत आवश्यकता असते. तज्ञांनुसार, योग्य आहार घेतल्यास चांगली झोप लागू शकते. यासाठी काही विशेष पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. बदाम, किवी, अक्रोड, केळं, काबुली चणे, दूध आणि भात या पदार्थांमुळे चांगली झोप येण्यास मदत होते.
'संडे मेट्रेस'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अल्फोंस रेड्डी आणि 'सिस्लो कॅफे'चे शेफ मृनमॉय आचार्यने यांनी उत्तम झोपेसाठी आवश्यक अशा पदार्थांबद्दल माहिती दिली.
भातात कॉर्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर भात पचनासही हलका असतो. त्यामुळे झोप येण्यास मदत होते.
रात्री जेवणात सलाड घेतल्याने लेक्टूकेरिअम मिळते. त्यामुळे शरीराला आराम मिळतो.
झोप येण्यासाठी काबुली चणे आश्चर्यकारकरित्या मदत करतात. प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असलेल्या काबुली चण्यात व्हिटॉमिन बी ६ ही मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात मेलोटोनिन हे झोपेचा संकेत देणारे हार्मोन स्त्रवण्यास सुरुवात होते.