स्त्रियांनो, हस्तमैथुन करण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, विवाहीत महिलांनाही ठरते फायदेशीर
(Photo Credits: Pixabay)

स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी हस्तमैथुन (Masturbation) ही सर्वात सुरक्षित क्रिया आहे. माणसांसोबत अनेक प्राण्यांमध्येही स्वमैथुन ही क्रिया चालते. भारतीय समाजात किंवा संस्कृतीमध्ये पुरुषांच्या हस्तमैथुन बद्दल उघडपणे बोलले जाते. मात्र स्त्रिया आपण हस्तमैथुन करतो ही गोष्टही स्वीकारत नाहीत, किंवा त्यांना संकोच, अपराधी वाटते. 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटामधील स्वरा भास्करच्या सीनमुळे उठलेले वादळ अजूनही आठवत असेल. भारतात स्त्री तिच्या लैंगिक अपेक्षा, आकांक्षा यांबद्दल बोलू शकत नाही, तिथे हस्तमैथुन ही फार दूरची गोष्ट आहे. तर पुरुषांप्रमाणे स्वतःला लैंगिक आनंद देण्यासाठी स्त्रियाही हस्तमैथुन करतात, त्यात काहीच गैर नाही. एका रिपोर्टनुसार जगभरात जवळपास 62 टक्के स्त्रिया हस्तमैथुन करतात. त्यामुळे स्त्रियांनी हस्तमैथुन करण्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.

> स्त्री-पुरुषांच्या लैंगिक क्रिडेमध्ये स्त्रिया परमोच्च बिंदूपर्यंत पोहचू शकत नाहीत. मात्र हस्तमैथुनामुळे आपल्याला काय हवे आहे, कशात आनंद मिळतो, सुखाचा उच्चतम बिंदू काय केले की गाठता येतो हे समजते.

> हस्तमैथुनामुळे शरीरात मुड चांगला करणारी संप्रेरक स्रवतात. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो.

> लग्नानंतर अनेक भारतीय महिला पति व सासरच्या लोकांना आनंदी ठेवता ठेवता स्वत:च्या आनंदाला हरवून बसतात. हस्तमैथुनामुळे स्त्रिया लैंगिक सुखाद्वारे स्वतःला सुखी अथवा खुश ठेऊ शकतात.

> झोपण्यापूर्वी हस्तमैथून केल्यामुळे तुम्ही रिलॅक्स होता. झोप येण्यासाठीही हस्तमैथुन फायद्याचे ठरते हे एका अभ्यासातून समोर आले आहे.

> बरेचवेळा सेक्समध्ये आपणाला काय हवे आहे हे स्त्रिया बोलून दाखवू शकत नाहीत. पुरुष त्यांना हव्या त्या गोष्टी ट्राय करून लैंगिक सुख मिळवतो, मात्र स्त्रिया असंतुष्ट राहतात. अशावेळी हस्तमैथुनाच्या माध्यमातून स्त्रिया ज्या गोष्टीमुळे आपणाला आनंद मिळतो त्या सर्व गोष्टी ट्राय करू शकतात. (हेही वाचा: आता सेक्ससाठी महिलांना पुरुषांची गरज नाही; ही खेळणी देत आहेत परमोच्च आनंद)

> राग, निराशा, चीडचीड अशा अनेक भावनिक आणि मानसिक समस्यांवर हस्तमैथुन हा एक चांगला उपाय ठरू शकतो.

दरम्यान, हस्तमैथुन पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे प्रजनन क्षमतेवर याचा कुठलाच प्रभाव पडत नाही. हस्तमैथुनामुळे अशक्तपणा येणे अथवा लैंगिकतेत कमतरता या पूर्णतः चुकीच्या गोष्टी आहेत. मात्र यामध्ये हस्तमैथुन हे प्रमाणात असावे हे ध्यानात ठेवा.