अननस खायला जितके चविष्ट असते तेवढेच अननसमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे अननस खाणे त्याचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया अननस खाण्याचे सर्व फायदे

रक्तदाब : व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स अननसमध्ये भरपूर प्रमाणात असतात.

वजन कमी करते : न्याहारीनंतर सुमारे दोन तासांनी अननसाचा रस प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते :रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही अननस प्रभावी आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खायला हवेत. (हे देखील वाचा:Benefits of Garlic: लसूण खाण्याचे फायदे जाणून व्हाल चकित, पाहा फायदे)

हाडे मजबूत होतात : अननसाचा रस हाडे मजबूत करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. वास्तविक, अननसमध्ये मँगनीज आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने हाडेच नव्हे तर दातही मजबूत होतात.

पचनसंस्था : ज्यांना अनेकदा पोटाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागते ते अननसाचा रस पिऊन त्यांची पचनक्रिया मजबूत करू शकतात.