
कोणतीही गोष्ट गरजेच्या पेक्षा अधिक करणे, आपल्या शरिरासाठी धातक ठरते. त्याचप्रमाणे लैंगिक संबंधही आपल्या शरिरासाठी घातक ठरू शकते. लैंगिक संबंध प्रमाणापेक्षा अधिक केल्याने आरोग्यासाठी धोकादायक ठरतात, याची अनेकांना माहिती नसते. यामुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महत्वाचे म्हणजे, अधिक वेळा लैंगिक संबंध ठेवल्याने त्याचे दुष्परिणाम होतात, हे बहुतेक लोकांना माहित नाही. दिवसातून अनेक वेळा संबंध ठेवल्यास महिलेच्या खासगी भागात संक्रमणाचा धोका वाढतो. संसर्गामुळे महिलांना खूप त्रास होतो. तसेच महिलांच्या खासगी भागातही सूज येते. याशिवाय महिलांनी अधिकवेळा लैंगिक संबंध ठेवल्यास त्यांना कोणकोणत्या शाररिक समस्यांना सामोरे जावा लागेल, यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.
महिलांच्या खाजगी भागात कोरडेपणा-
संबंधित व्यक्ती दिवसात अधिकवेळा लैंगिक संबंध ठेवत असले तर, महिलेच्या खाजगी भागात कोरडेपणा निर्माण होऊ शकतो.
खाज किंवा जळजळ होणे-
दिवसात अधिकवेळा लैंगिक संबंध ठेवल्याने खाजगी भागावर जळण किंवा खाज सारखा त्रास उद्भवू शकतो. हे पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकते. खाजगी भागात खाज संसर्गचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे लैंगिक संबंध ठेवल्याने संबंधित व्यक्तीने आपली खाजगी जागा स्वच्छ धुणे गरजेचे आहे. हे देखील वाचा- आपला पार्टनर आपली फसवणूक करत आहे हे कसं समजेल? जाणून घ्या 'ही' काही लक्षणं
आरोग्यावर परिणाम-
अधिक लैंगिक संबंध ठेवल्याने लैंगिक आरोग्यच बिघडते, या व्यतिरिक्त आपल्या जोडीदाराशी आपले संबंध खराब होऊ शकतात. जर तुम्ही अधिक संबंध ठेवले तर, तुमचा पार्टनर तुम्हाला कंटाळून जाऊ शकतो. लैंगिक संबंध ठेवण्याचे कारण म्हणजे उच्च कामेच्छा निर्माण होणे होय. महत्वाचे लैंगिक संबंध ठेवल्यानंतर प्रत्येकाने आपल्या जोडीदारांमध्ये अंतर देणे गरजेचे आहे. अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही )