फोटो सौजन्य- Pixabay

आहारामध्ये नेहमीच पालेभाज्यांचा समावेश असवा असे बऱ्याचवेळा डॉक्टरांकडून सांगितले जाते. तसेच पालेभाज्यांमधून लोह, कॅल्शिअम आदीसारखे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. तर कंदमुळांच्या भाज्यांमध्ये समावेश असलेला मुळा हासुद्धा आरोग्यासाठी लाभदायी आहे. तर पाहूया मुळा कॅन्सरच्या रुग्णांना कशा पद्धतीने शरीरसाठी आरोग्यावर्धक ठरतो.

- मुळा या पालेभाजीमध्ये पोटॅशिअम, फोलेट, राईबोफ्लेविन, नायसिन, विटमीन के, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि विटामिन बी-6 या शरीरासाठी पोषक असणाऱ्या तत्वांचा समावेश असतो.

- शरीरातील उच्च दाबाचे प्रमाणार नियंत्रण

मुळ्यामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च दाब असलेल्या रुग्णांच्या शरीरामध्ये रक्ताचे संचारण सुलभ पद्धतीने करण्यास मदत करतो.

-पचनचासाठी उत्तम

मुळ्यातील फायबरमुळे पाचन क्रिया योग्य रितीने होते. तसेच आहार पचण्यास कोणताही त्रास होत नाही.

-प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत

विटामीन सी युक्त मुळ्याचे सेवन केल्यास शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच आजारपणावेळी मुळ्याचा आहारात समावेश केल्यास आजार लवकर बरे होण्याची शक्यता असते.

- त्वचेसाठी उपयुक्त

नियमित मुळा ज्यूस प्यायल्याने त्वचा उजळ होते. त्याचबरोबर त्वचेशी संबंधित आजार दूर राहतात.

-लाल रक्त पेशीं खराब होण्यासपासून बचाव

मुळ्याच्या सेवनाने रक्तातील लाल पेशी खराब न होण्यास मदत होते. तसेच मुळ्यामधून शरीरातील ऑक्सिजनचा होणारा पुरवठा वाढण्यास मदत होते.

त्यामुळे खास करुन कॅन्सरच्या रुग्णांनी मुळ्याचे भरपूर प्रमाणात सेवन केल्यास या आजारापासून दूर राहण्यास मदत होते.