Surya Grahan 2019: ग्रहणामध्ये भारतातील हे एकमात्र मंदिर सोडून सर्व धार्मिळ स्थळे राहणार बंद; जाणून घ्या त्यामागचे कारण
Solar Eclipse (Photo Credits: Pixabay)

Solar Eclipse 2019: 26 डिसेंबरला 2019 मधील शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे. हा दुर्मिळ योग 57 वर्षानंतर आल्यामुळे हे सूर्यग्रहण विशेष असणार आहे. ग्रहणाचा काळ हा अशुभ मानला जात असल्या कारणाने या दिवशी सर्व धार्मिळ स्थळे बंद असतात. तसेच या मंदिरांमध्ये कोणतेही शुभकार्य किंबहुना सर्वसाधारपणे कोणतेही शुभकार्य केले जात नाही. ग्रहणाच्या काळात आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर मंदिर आणि सबरीमाला मंदिर 26 डिसेंबरपर्यंत जवळपास 13 तास बंद राहणार आहे कारण पुर्ण सूर्यग्रहण सकाळी 8.08 वाजता सुरु होईल.

तिरुमाला तिरुपती देवस्थानाने सांगितले आहे की, परंपरेनुसार हे मंदिर 25 डिसेंबरला रात्री 11 वाजता बंद केले जाईल आणि त्याचा शुद्धी समारोह 26 डिसेंबरला दुपारी 12 नंतर केला जाईल.

ग्रहणात मंदिरं का ठेवली जातात?

भारतात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार, या दरम्यान सूर्य आणि चंद्र नकारात्मक ऊर्जा सोडली जाते. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. सूर्य ग्रहण तेव्हा असतो, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी मधून जातो आणि सूर्याला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास रोखतो. सूर्यग्रहणात सूर्याचा प्रकाश आणि चुंबकीय ऊर्जेची कमतरता असते, तर चंद्रग्रहणात चंद्र,पृथ्वी आणि सूर्य एकाच रेषेत आल्या कारणाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे बदल होतो. ही नकारात्मक ऊर्जेचे सावट मंदिरांवर पडू यासाठी मंदिरे बंद ठेवली जातात.Surya Grahan 2019: ग्रहणात गर्भवती महिलांनी कशी घ्यावी काळजी

ग्रहणात भारतातील सर्व मंदिरे बंद असली तरीही श्री कालहस्तीतील (Kalahasthi)कलहस्थिस्वर मंदिर (Kalahasteeswara Temple)असे मंदिर आहे जे ग्रहणातही बंद केले जात नाही. कारण हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे ज्यात राहु आणि केतु ची पूजा केली जाते. असे सांगितले जाते की यामुळे ग्रहणाचा या मंदिरावर कोणताही परिणाम होत नाही.