Total Seats
BJP+ 352
Others 99
Congress+ 91
542 / 542

Sikkim Assembly Elections 2019

SeatsSKMSDFOthers
32
17
15
0

Andhra Pradesh Assembly Elections 2019

SeatsYSRCPTDPOthers
175
151
23
1

Odisha Assembly Elections 2019

SeatsBJDBJPOthers
147
112
23
11

राशीभविष्य 14 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस? कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे

राशीभविष्य 14 मार्च: पाहा कसा असेल तुमचा आजचा दिवस? कोणत्या राशींसाठी काय काळजी घेणं आवश्यक आहे
राशी भविष्य(फोटो सौजन्य- फाईल इमेज)

14 मार्च 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: आज तुमच्या जवळ राहिलेली कामे करण्यासाठी वेळ असेल. त्यामुळे कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- भुकेल्यांना जेवण द्या.

शुभ अंक- 2

शुभ रंग- पांढरा

वृषभ: वृषभ राशीतील व्यक्तींना आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे दे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल.

शुभ उपाय- शनि देवाची उपासना करा.

शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींना आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. तुमच्या जवळ नवीन संधी साधून आल्याने त्याचा पूरेपूर उपयोग करा.पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. तसेच घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल.

शुभ उपाय- देवाला लाल रंगाचे वस्र परिधान करा.

शुभ दान- वृद्धाश्रमातील व्यक्तींना भेट द्या.

शुभ अंक- 4

शुभ रंग- हिरवा

कर्क: कर्क राशीतील व्यक्तींकडे आज पैशांची भरभराट होईल.तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. मात्र भांडण करणे टाळा.

शुभ उपाय- कुलस्वामिनीची उपासना करा.

शुभ दान- मंदिर उभारणीच्या कामात मदत करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- जांभळा

सिंह: तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.

शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- पांढरा

कन्या: आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा कामे संयमाने पूर्ण करा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.

शुभ उपाय- हिरव्या भाज्यांचे सुप प्या.

शुभ दान- लाल रंगाचे वस्र दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- करडा

तुळ: तुळ राशीतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्यास भेटतील. घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल.

शुभ उपाय- काळे तीळ पाण्यात सोडा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- करडा

वृश्चिक: घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. तर वृश्चिक व्यक्तींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे. आई-वडिल यांच्या आज्ञांचे पाल करा. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.

शुभ उपाय- काळे तीळ आणि नारळ समुद्राच्या पाण्यात सोडा.

शुभ दान- रस्त्यातील गरीब व्यक्तीला अन्नदान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- सोनेरी

धनु: धनु राशीतील व्यक्तींना आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल.

शुभ उपाय- गणपतीची आराधना करा.

शुभ दान- गुळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पिवळा

मकर: आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींसाठी उत्साही असेल. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील मंडळीना वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- सकाळी लवकर उठून सूर्य देवतेची पूजा करा.

शुभ दान- गरजूंना अन्नदान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

कुंभ: कुंभ राशीतील व्यक्तींनी आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत करा. प्रिय व्यक्तींशी प्रेमाने वागा. परिवारातील मंडळींची साथ लाभेल.

शुभ उपाय- काळे तीळ पाण्यात सोडा.

शुभ दान- गाईला चारा घाला.

शुभ अंक- 5

शुभ रंग- केशरी

मीन: मीन राशीतील व्यक्तींना आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

आजचा दिवस तुम्हाला आनंददायी जावो ! तुमच्या मनातील सार्‍या इच्छा पूर्ण होवोत ही आमच्याकडून तुम्हांला सदिच्छा.

Lok Sabha Election Results 2019