सुरक्षा दलाकडून खात्मा करण्यात आलेल्या झाकीर मुसा याच्या अंत्यदर्शनासाठी हजोरच्या संख्येने उपस्थिती
फोटो सौजन्य- ANI

अल-कायदा यांच्या सोबत संबंध असलेला अन्सार गझवट इल हिंद या दहशतवादी संघनेचा प्रमुख झाकीर मुसा (Zakir Musa)  याचा सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. तर मुसा याच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली गेली होती. काहींनी मुसाच्या समनार्थ घोणषाबाजी केली तर काहींनी दगडफेक केले.

गुरुवारी झालेल्या दहशतवादी यांच्या गोळीबारच दक्षिण काश्मिर मधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल मध्ये झाकीर मुसा याचा खात्मा करण्यात आला.त्यावेळी मुसाकडून मोठ्या प्रमाणात शस्रासे जप्त करण्यात आली. मुसाचा मृत्यू झाल्याचे समजताच शुक्रवारी शोपियाँ, पुलवामा, अवांतीपोरा, श्रीनगर या भागात मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चे काढण्यात आले. लोकांनी मुसा याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.(Pulwama encounter: भारतीय लष्कराची मोठी कारवाई; मोस्ट वॉंटेड दहशतवादी झाकीर मुसा ठार)

शुक्रवारी सकाळी मुसा याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. तसेच मुसाच्या मृत्यूनंतर शुक्रवारी पुलवामा येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पुलवामा आणि जुने श्रीनगर येथे काही तरुण रस्त्यावर उतरले होते. त्यांनी मुसाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलांवर दगडफेकही केली.