Greater Noida Road Rage: बीएमडब्ल्यूतील तरूणांचा कुटुंबावर हल्ला, कार ओव्हरटेक करून बाटल्याही फेकल्या; ग्रेटर नोएडामधील घटना
Photo Credit- X

Greater Noida Road Rage: ग्रेटर नोएडा(Greater Noida)मधून तरूणांच्या गुंडगिरीची घटना समोर आली आहे. नॉलेज पार्क परिसरात कारमधून हॉस्पीटलमध्ये जाणाऱ्या एका कुटुंबावर एका टोळक्याने हल्ला केला. त्यांना घाबरवण्यासाठी त्यांच्या कारवार बाटल्या फेकण्यात आल्या. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाहीये. मात्र, या घटनेमुळे कुटुंब अत्यंत घाबरलेले आहे. कारमधील एका सदस्याने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड (Road Rage Video)केला आहे. तो रेडीटवर पोस्ट केला आहे. टोळक्याने पिडीत कुंटुंबाची कार 2-3 वेळा ऑव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे कारमधील महिला प्रवासी घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्याचेही दिसत आहे. (हेही वाचा:Brazil Flood Video: क्षणात होत्याचे नव्हते झाले; ब्राझीलमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज पुलावर आदळले (Watch Video))

ग्रेटर नोएडा भागात अशा घटना वारंवार घडताना दिसतात. त्यामुळे गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे. कार चालकाच्या तप्तरतेमुळे कारमधील सर्वांचे जीव वाचल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. कारण त्या टोळक्यामुळे कार पळवताना त्या कुटुंबाची कार चुकीच्या लेनमध्ये गेली होती. त्यानंतर पुन्हा त्या टोळक्याने त्यांना ऑव्हरटेक केले. ज्यामुळे त्यांना कार पळवता आली नाही. BMW मधून तिघांनी उतरून त्यांच्या कारवर वाटल्या फेकण्याचा प्रयत्न केला. कार चालकाने प्रसंगावधान राखून यू टर्न घेत कार पळवली. अशा वेळी कारच्या काचा फुटण्याची शक्यता असते. ज्यामुळे प्रवासी जखमी होण्याची दाट शक्यता असते. मात्र, तसे काही झाले नाही.

Goons in BMW attacked family at 1 AM in Greater Noida, this is so scary man, also shows the importance of dashcam

byu/D_Invincible inCarsIndia