Representational Image (Photo Credits: ANI)

तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने सरकारी नोकरी (Government Job) मिळाली म्हणून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडली आहे. जर आपल्याला नोकरी मिळाली, तर आपण आपला जीव देवाच्या चरणी अर्पण करू, असं या व्यक्तीने अगोदरचं ठरवलं होतं. कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोइल येथे ही घटना घडली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नाव नवीन असं असून तो 32 वर्षाचा होता. हा तरुण आयुष्यात कोणतीही नोकरी मिळवू न शकल्यामुळे निराश झाला होता. या व्यक्तीने आपल्याला नोकरी मिळाली तर, आपण आत्महत्या करू, असं वचन दिलं होतं. दरम्यान, नवीनला मुंबईत बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळाली. हा जॉब जॉइन करण्यासाठी तो ऑफिसलाही गेला होता. तिथे त्यांने 15 दिवस काम केलं. सुमारे 15 दिवसानंतर नवीन शुक्रवारी त्रिवेंद्रमला रवाना झाला आणि त्याने रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली. (हेही वाचा - Gurugram Police: आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असताना 'त्या' तरुणीवर लैंगिक अत्याचार झालाच नाही; गुरुग्राम पोलिसांची माहिती)

यावेळी नवीनजवळ एक सुसाइड नोटदेखील सापडली. ज्यामध्ये त्याने असे लिहिले आहे की, तो देवाला दिलेल्या वचनाची परतफेड करीत आहे. नोकरी मिळाल्यास तो देवाच्या आश्रयाला येईल, असं वचन नवीनने देवाला दिलं होतं. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असंही त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. (वाचा - Uttar Pradesh Crime: पती तुरुंगात गेल्यानंतर पत्नीचे दीरासोबत जुळले प्रेमसंबंध; 3 वर्षाने जामिनावर सुटून आल्यानंतर मोठ्या भावाची केली हत्या)

या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नवीवचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. नवीनच्या आत्महत्येमागे आणखी काही वेगळं कारण होत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिस या प्रकरणी संबंधित लोकांशी बोलत असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.