Shocking! दोन आंब्यासाठी तरुणाला वडील आणि भावाकडून बेदम मारहाण; जखमी तरुणाचा मृत्यू
आंबा (Photo credits - PTI File Photo)

Shocking!  उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील गोरखपूरच्या गुलरीहा पोलीस स्टेशन हद्दीतील जैनपूर गावात फक्त दोन आंब्यासाठी वडील आणि भावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा रात्री मृत्यू झाला. तरुणाची पत्नी किरणच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

जैनपूर येथील रहिवासी असलेल्या रामरतन निषाद यांचा रविवारी वडील मोहित निषाद आणि भाऊ सुरेंद्र निषाद यांच्याशी आंबे तोडण्यावरून वाद झाला. वडील आणि भावाने मिळून रामरतनला काठ्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. रामरतनची पत्नी किरण यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी एका झाडावरून आंबे तोडून आपापसात वाटण्यात आले. यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास किरणचा पती रामरतन याने झाडावर राहिलेले दोन आंबे तोडले. यावरून दोन्ही बाजूंनी शिवीगाळ झाली. त्यानंतर वडील मोहित आणि भाऊ सुरेंद्र यांनी मिळून रामरतनला बेदम मारहाण केली. (हेही वाचा - Crime: पालकांनी 12 वर्षीय मुलीचे दोनदा लावले लग्न, गर्भवती राहिल्यावर घटना आली उघडकिस)

मारहाणीदरम्यान आरोपींच्या धमकीमुळे गावकरीही मदतीला आले नाहीत. उपचाराशिवाय रामरतन रात्रभर आरडाओरड करत राहिले. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूची माहिती किरणने कुटुंबीयांना दिली आणि गुलरिहा पोलिसांनाही कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.

इन्स्पेक्टर गुलरीहा उमेश कुमार बाजपेयी यांनी सांगितले की, किरणच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.