योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी प्राइमरी मार्केटमध्ये मोठा धमका केला आहे. बाबा रामदेव यांनी पतंजली समूहाच्या (Patanjali Group) 4 कंपन्यांचे IPO आणण्याची घोषणा केली आहे. पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस, पतंजली मेडिसिन आणि पतंजली लाईफस्टाईल कंपनीचे आयपीओ येणार आहेत. या सर्व कंपन्या येत्या 5 वर्षांत शेअर बाजारात दाखल होतील. त्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. योगगुरू म्हणाले की, सध्या पतंजली समूहाची उलाढाल 40,000 कोटी रुपयांची आहे. येत्या काही वर्षांत आमचा व्यवसाय अधिक वेगाने वाढणार असून आम्ही देशभरातील पाच लाख लोकांना रोजगार देणार आहोत.
येत्या पाच वर्षांत पतंजलीच्या 5 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. या पाच सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 5 लाख कोटींचे उद्दिष्ट आहे. पतंजलीची रुची सोया कंपनी आधीच बाजारात लिस्ट झाली आहे. 'व्हिजन आणि मिशन 2027' ची रूपरेषा आखणे आणि भारताला स्वावलंबी बनवण्यात समूहाच्या योगदानासाठी पुढील 5 वर्षांसाठी 5 प्रमुख प्राधान्यक्रम समोर आणण्याचे पतंजलीचे उद्दिष्ट आहे. (हेही वाचा - World Second Richest Person: Gautam Adani बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या कुठून येतो 'इतका' पैसा)
पतंजलीचा महसूल आर्थिक वर्ष 2022 मध्ये वाढून 10,664.46 कोटी झाला. मागील आर्थिक वर्षात ते 9,810.74 कोटी होते. तथापि, वित्त वर्श 2022 मध्ये निव्वळ नफ्यात किरकोळ घट झाली. पतंजलीचा निव्वळ नफा 745.03 कोटींच्या तुलनेत 740.38 कोटी होता.
उत्तराखंडमध्ये 1,000 कोटींची गुंतवणूक -
योगगुरू बाबा रामदेव यांनी 14 सप्टेंबर रोजी पतंजली योगपीठ उत्तराखंडमध्ये 1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली होती. सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि उत्तराखंडच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार करणे या गुंतवणुकीचे उद्दिष्ट असेल, असंही त्यांनी म्हटलं होतं.