Sonipat Stray Bull Attacks Woman: हरियाणातील सोनीपत येथे गणौर गावात एका भटक्या बैलाने महिलेवर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. महिला घरासमोर साफसफाई करत होती त्यावेळी ही घटना घडली आहे. हल्ल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना 28 जून रोजी घडली आहे. (हेही वाचा- शिवनदी पुलावर मगरीचा मुक्त वावर, व्हिडिओ व्हायरल (Watch)
मिळालेल्या माहितीनुसार, महिला घरासमोर झाडलोट करत होती. अचानक समोरून भटका बैल आणि आणि महिलेवर त्याने हल्ला चढवला. बैलाने महिलेला उचलून फेकले. त्यानंतर पुन्हा एकदा बैलाने महिलेवर हल्ला चढवला. महिला रस्त्यावर पडली. घाबरलेल्या पीडित महिलेने आरडाओरड सुरु केला. तेवढ्यात शेजारचे बाहेर आले आणि तिच्या कुटुंबातील एक सदस्याने महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन पिसाळलेला बैलांची झुंज सुरु झाली.
महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. सद्या तिच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना केव्हा घडली हे अद्याप समोर आले नाही. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. थोडक्यात महिलेचा जीव वाचला आहे.