विकिपीडियाने राजस्थानचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले सचिन पायलट यांचे नाव
सचिन पायलट (Photo-PTI)

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगना राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालावर सर्व देशाचे लक्ष लागून आहे. अजूनही मतमोजणी सुरु असून सत्तास्थापनेचे संकेत मिळायला सुरुवात झाली आहे. अशातच राजस्थान राज्यात वसुंधराराजे जिंकूनही भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. अशातच कॉंग्रेसच्या सचिन पायलट यांना विकिपीडियाने राजस्थानचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे. अजूनतरी राजस्थानने नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा केली नाही त्याआधीच अपडेट झालेले विकिपीडिया पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र हे नाव सर्वानुमते ठरेल असे सकाळी सांगण्यात आले होते. त्याआधीच सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीम्हणून घोषित केले आहे.