Barabanki Horror: उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधील फतेहपूर कोतवाली भागातील बसरा गावात एका व्यक्तीने पत्नीच्या अनैतिक संबंधावरून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी पतीने आपल्या पत्नीचा गळा चिरला आणि तिचं मुडंक हातात घेऊन बाहेर रस्त्यावर फिरत होता. या घटनेचा थरारक व्हिडिओ एकाने कॅमेरात कैद केला आहे. शुक्रवारी या घटनेनंतर गावात एकत खळबळ उडाली आहे. गावात घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी देखील पश्चिम बंगाल मध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एक भयावह घटना समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली गावातील रहिवासी असलेला आरोपीने अनिलने हे कृत्य केले आहे. अनिल गावात मजुरीचे काम करतो. आरोपी अनिल आणि त्याची पत्नी वंदना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडणाचे वातावरण निर्माण झाले होते. महिन्याभरापूर्वीच दोघेंच लग्न झालं होते. दरम्यान वंदना नातेवाईकांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्त बाहेर गावी गेली होती. तिथे ती एका पुरुषासोबत दिसली. त्यामुळे अनिलला वंदनाचा अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. त्यानंतर घरात देखील वंदनाचा लव्ह लेटर अनिलच्या हाती सापडला, या घटनेमुळे अनिलला राग अनावर झाला आणि दोघांमध्ये वाद झाला.
🚨संवेदनशील वीडियो🚨
UP : जिला बाराबंकी में अनिल ने पत्नी वंदना की हत्या कर दी। कटी हुई गर्दन लेकर वो थाने पर पहुंच गया। वंदना का कहीं और अफेयर था। घर में लव लेटर देखकर अनिल ने ये वारदात की। pic.twitter.com/jsFP91mdzM
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) February 16, 2024
वादात रागाच्या भरात अनिलने वंदनाला मारहाण केली. त्यानंतर अनिलने विळा घेऊन तिचा गळा चिरला. त्यानंतर न घाबरता पत्नीचे छिन्नविछिन्न मुडंके आणि विळा हातात घेऊन बाहेर पडला. बाहेर पडताच सर्वींकडे घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना घटनाची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केले. भयावह दृश्य एकाने कॅमेरात कैद केले. थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाढते गुन्हेगारीते प्रमाण पाहून सर्वसामान्य लोकांमध्ये भीती पसरत जात आहे.