Republic Day Parade 2022 Live Streaming: प्रजासत्ताक दिन परेड लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहाल? असं करा रजिस्ट्रेशन
Republic Day Parade (Photo Credits: ANI)

Republic Day Parade 2022 Live Streaming: उद्या म्हणजेचं बुधवारी 26 जानेवारी रोजी राजपथवर प्रजासत्ताक दिनाची नेत्रदीपक परेड दाखवली जाईल. यंदा भारत 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना अस्तित्वात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान बनवण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक देश म्हणून आपल्या देशाचा नवा प्रवास सुरू झाला. या दिवशी राजपथावर दिसणारी नेत्रदीपक परेड पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दिल्लीत येतात. इतकेच नाही तर अनेक परदेशी नागरिकही भारताच्या प्रजासत्ताक दिनाची परेड पाहण्यासाठी येथे पोहोचतात. यावेळी प्रजासत्ताक दिनाची परेड कधी, कुठे आणि कशी पाहायची? लाइव्ह स्ट्रीमद्वारे तिकिटांची व्यवस्था कशी करावी? या सर्वाची माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण असेत ते म्हणजे परेड. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून परेडची सुरुवात होते. त्यानंतर एकामागून एक, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या अनेक रेजिमेंट्स त्यांच्या बँडसह राष्ट्रपती भवनापासून राजपथच्या दिशेने येतील. हे संचलन पथक इंडिया गेटमार्गे लाल किल्ल्यावर जाणार आहे. यंदा ही परेड सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. (वाचा - Monica Oh My Darling गाण्याच्या तालावर थिरकले भारतीय नौदलाचे जवान; पहा व्हायरल व्हिडिओ)

प्रजासत्ताक दिन परेड 2022 कुठे पाहायची?

प्रजासत्ताक दिनाची परेड दूरदर्शनवर थेट दाखवली जाते. याशिवाय, तुम्ही झी न्यूजसह सर्व वृत्तवाहिन्यांवर त्याचे थेट प्रक्षेपण देखील पाहू शकता. याशिवाय, तुम्ही विविध प्लॅटफॉर्मवर प्रजासत्ताक दिन परेड थेट पाहू शकता. संरक्षण मंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम थेट दाखवण्यासाठी www.indianrdc.mod.gov.in वेबसाइट आणि 'Indian RDC' नावाचे YouTube चॅनल देखील तयार केले आहे. याशिवाय, तुम्ही दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनेलवर लाइव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकता. या सर्व ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनापासून राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि इंडिया गेट येथे सकाळी परेड संपेपर्यंत पाहता येईल. इतकेच नाही तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील करेल.

प्रजासत्ताक दिन परेड 2022 नोंदणी कशी करावी?

तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम ऑनलाइन पाहायचा असेल, तर तुम्ही MyGovIndia च्या अधिकृत वेबसाइट https://www.mygov.in/rd2022 वर लॉग इन करून ऑनलाइन नोंदणी करू शकता. यासाठी तुम्हाला Register Now बटणावर क्लिक करावे लागेल. दिलेल्या जागेत तुमचे नाव आणि ऑनलाइन कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांची संख्या एंटर करा, ड्रॉप डाउनमधून तुमचे राज्य निवडा. त्यानंतर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पाहायचा आहे की बीटिंग रिट्रीट कार्यक्रम पाहायचा आहे किंवा दोन्ही पाहायचे असतील तर दोन्हीच्या शेजारी असलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करा. तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका. तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. OTP एंटर केल्यावर, तुम्हाला संरक्षण मंत्रालय आणि MyGovIndia द्वारे जारी केलेल्या 73 व्या प्रजासत्ताक दिनासाठी तुमचे प्रेम आणि एकता दर्शवण्यासाठी कलेक्टरचे 'सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट' देखील मिळेल. खाली पहा सर्टिफिकेट असे काही असेल.

प्रजासत्ताक दिन परेड 2022 तिकीट व्यवस्था -

कोरोना प्रोटोकॉलमुळे, यावर्षी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम पाहण्यासाठी काही लोकांनाच राजपथवर येण्याची परवानगी आहे. जर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचा पास मिळवायचा असेल तर तुम्हाला खूप उशीर झाला आहे. 7 जानेवारीपासून पासची विक्री सुरू झाली आहे, शेवटची तारीख 25 जानेवारी आहे. तथापि, मुख्य कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी फारच कमी लोकांना आहे, त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळणे कठीण आहे. तरीही, तुम्हाला एका पाससाठी 20 ते 500 रुपये खर्च करावे लागतील. राजपथवर एकूण 24 हजार लोकांना येण्याची परवानगी आहे, त्यापैकी 19 हजार आमंत्रित पाहुणे आहेत. इतर लोकांसाठी फक्त 5 हजार पास उपलब्ध आहेत.

प्रजासत्ताक दिन परेडसाठी तिकीट कोठे खरेदी करायचे?

यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी ऑनलाइन तिकिटे उपलब्ध नाहीत. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही खाली दिलेल्या केंद्रांवर जाऊन पास मिळवू शकता.

नॉर्थ ब्लॉक

सेना भवन – गेट क्रमांक 2

प्रगती मैदान – गेट क्रमांक 1, भैरों रोड

जंतर-मंतर - मुख्य द्वार

शास्त्री भवन – गेट क्रमांक 3 जवळ

जामनगर हाऊस - इंडिया गेट समोर

लाल किल्ला - 15 ऑगस्ट उद्यानाच्या आत आणि जैन मंदिरासमोर

सर्वांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, एका ओळखपत्रावर फक्त एकच पास दिला जाईल.