Husband Gives Triple Talaq To Wife Due to Dowry: हुंड्यात स्कॉर्पिओची मागणी पूर्ण न केल्यास तरुणाने पत्नीला दिला तिहेरी तलाक; 5 जणांवर गुन्हा दाखल
Husband Gives Triple Talaq To Wife प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Husband Gives Triple Talaq To Wife Due to Dowry: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बांदा येथे तिहेरी तलाक (Triple Talaq) संदर्भातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाची हुंड्याची (Dowry)

मागणी पूर्ण न झाल्याने त्याने आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिला. पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांनी हुंडाबळी प्रकरणी इतर गंभीर कलमांखाली 5 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण पैलाणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितले की, 2015 मध्ये फतेहपूर जिल्ह्यात मुस्लिम रितीरिवाजांनुसार तिचा विवाह झाला होता. लग्नात वडिलांनी हुंडा म्हणून 15 लाख रुपये दिले होते. लग्नानंतर पती आणि इतर सासरच्यांनी हुंडा म्हणून स्कॉर्पिओची मागणी केली होती. परंतु, ही मागणी पूर्ण न केल्याने सासरच्यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. (हेही वाचा -Mumbai: पत्नीला तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल)

पतीने पत्तीला दिली दुसरा विवाह करण्याची धमकी -

पती पुन्हा लग्न करण्याची धमकी देत ​​असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. जुलै महिन्यात त्याने पीडितेला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. तेव्हापासून ही महिला तिच्या माहेरी राहत आहे. पीडितेने सांगितले की, शुक्रवारी माझा नवरा माझ्या माहेरी आला आणि जबरदस्तीने भांडू लागला. तसेच हुंड्यात बोली केलेली स्कॉर्पिओ न मिळाल्याने त्याने मला तलाक तलाक तलाक म्हणत सर्वांसमोर तीनदा तलाक दिला. (हेही वाचा - Triple Talaq Bill: तिहेरी तलाक दिल्यास काय होईल शिक्षा? जाणून घ्या ह्या विधेयकाविषयी सविस्तर)

दरम्यान, पैलानी पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल कुमार यांनी सांगितले की, हुंड्यासाठी तिहेरी तलाक देण्याचे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आले आहे. महिलेने पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध छळ आणि तिहेरी तलाक लादल्याबद्दल तक्रार पत्र दिले आहे. या प्रकरणी तत्काळ एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. आरोपींच्या अटकेसाठीही प्रयत्न सुरू आहेत.