तरुणवर्ग अराजकता, जातीवाद, घराणेशाहीच्या विरोधात– पंतप्रधान नरेंद्र मोदी
Narendra Modi (Photo: Twitter)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमी मन की बात (Mann Ki Baat) या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारंवार जनतेशी संवाद साधत असतात. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी आज नवा विषय मांडत सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. दरम्यान, त्यांनी तरुणांसंबंधित महत्वाचा मुद्दा मांडला आहे. देशातील या तरुणांना अराजकतेच्या परिस्थितीची चीड आहे. जातीवाद घराणेशाही त्यांना आवडत नाही, असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले आहे. विकासाच्या कामासाठी तरुणवर्ग मोलाटा वाटा उचलत असतात. या दशकात देशाच्या विकासाला गती देण्यामध्ये त्या लोकांचा सक्रिय सहभाग असणार आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

नरेद्र मोदी वारंवार त्यांच्या भाषणातून तरुणवर्गाला प्रोत्साहित करण्याचे काम करत असतात. देशातील विकासाच्या कामासाठी तरुणवर्ग महत्वाचे साधन आहे, असेही ते बोलत असतात. आज त्यांनी मन की बात या कार्यक्रमातून तरुणांविषयी आपले मत मांडले आहे. दरम्यान, पंतप्रधान म्हणाले, 2019 या वर्षाला निरोप देण्यासाठी काही क्षणच आता आपल्यासमोर राहिले आहेत. त्यानंतर आपण केवळ नव्या वर्षात प्रवेश करणार नाही, तर नव्या दशकात प्रवेश करणार आहोत. या दशकात देशाच्या विकासाला गती देण्यामध्ये त्या लोकांचा सक्रिय सहभाग असणार आहे. ज्यांचा जन्म 21व्या शतकात झाला आहे. सध्या देशातील तरुणांना अशी व्यवस्था हवी आहे. ज्यामध्ये अराजकता, जातीयवाद आणि घराणेशाही नको. अशीच व्यवस्था त्यांना आवडते आणि याच व्यवस्थेसोबत ते असतात. हे देखील वाचा-महाराष्ट्रातही कन्नड लोक राहतात हे लक्षात ठेवा- अरविंद सावंत

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा देशात कोणतीही चुकीची घटना घडते, त्यावेळी सर्वात अगोदर तरुणवर्ग आवाज उठवतात. हा एक नवीन प्रकारचा नियम, नवीन प्रकारचे युग आहे. आज या तरुण पीढीपासून खूप आशा आहे. स्वामी विवेकानंद यांनीदेखील तरुणांवर मोठा विश्वास दाखवला होता. यातूनच माझे कार्यकर्ते समोर येणार आहे.