दिल्ली दौऱ्यानंतर ममता बॅनर्जी घेणार उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट; काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट न घेता आणि पक्षाच्या बड्या काही नेत्यांना टीएमसीमध्ये एन्ट्री देत राष्ट्रीय राजकरणात अधिक सक्रिय होण्याचे संकेत देण्यास सुरुवात केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणूकीपूर्वीच आपला पक्ष तृणमूल काँग्रेसच्या विस्तारासाठी बॅनर्जींनी आतापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहेत. राजकीय विश्लेषकांचे असे म्हणणे आहे की, ममता बॅनर्जी आपल्या पक्षाला भाजपच्या विरोधात काँग्रेसला ऑप्शन म्हणून दाखवत आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेण्यासाठी मंगळवारी ममता बॅनर्जी लवकरच मुंबईत दौरा करणार आहेत.

टीमएसी काँग्रेसचे काही नेते जसे गोव्याचे माजी काँग्रेसी मुख्यमंत्री लुइजिन्हो फलेरियो यांना सहभागी करुन घेतले आहे. त्याचसोबत टीएमसीने मेघालयात 18 पैकी 12 काँग्रेस आमदारांना आपल्याकडे वळवले. यामुळे टीएमसी राज्य विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. टीएमसी प्रवक्ता कुणाल घोष यांनी त्यांच्या मुंबई दौऱ्याची पुष्टी करत असे म्हटले की, ममता बॅनर्जी भाजपच्या विरोधात एक मजबूत विरोधी चेहरा आहे.

ममता बॅनर्जी गोवा, युपी, मेघालय, त्रिपुरा आणि असम मध्ये तृणमूल काँग्रेसचा विस्तार केल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच राजस्थान येथे दौरा करणार असल्याची शक्यता आहे. तृणमूल आगामी गोवा विधानसभा निवडणूकीसाठी प्लॅन तयार करत आहे. तर पक्षाकडून त्रिपुरा मध्ये सुरु असलेल्या नगरपालिका निवडणूकीत सुद्धा आपल्या विजयाचा झेंडा फडकवू पाहत आहेत. आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राज्यात गुंतवणूकीसाठी काही व्यापाऱ्यांच्या प्रमुखांना भेटण्याची शक्यता आहे.