कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते गुरुवारी म्हणजेच 7 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर कोलकाता येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत माहिती दिली.  अभिजित गंगोपाध्याय म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये केवळ भाजप तृणमूल काँग्रेसशी लढू शकते. याची न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा पत्र आणि त्याची प्रत देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती टीएस शिवगनम यांना पाठवली.  (हेही वाचा - Arjun Modhwadia Resigns: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, पोरबंदरचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांचा पक्षाला रामराम)

पाहा व्हिडिओ -

न्यायमूर्ती गंगोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याच्या सुनावणीशी संबंधित होते. ते यावर्षी ऑगस्ट 2024 मध्ये निवृत्त होणार होते. राजीनामा जाहीर करताना त्यांनी पश्चिम बंगालमधील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राज्यातील सत्ताधारी टीएमसीवरही हल्ला चढवला होता. गंगोपाध्याय पश्चिम बंगालमधील तमलूक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.

बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत येथून विजय मिळवला होता. अधिकारी तेव्हा टीएमसीचे नेते होते. टीएमसी सोडल्यानंतरही २०१६ च्या पोटनिवडणुकीत टीएमसीचा उमेदवार येथून विजयी झाला.