West Bengal: सीमा सुरक्षा दल (BSF)ने पश्चिम बंगालच्या 24 परगना जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. भारत-बांगलादेश सीमेवरून 12 कोटी रुपये किमतीची 89 सोन्याची बिस्किटे जप्त केली. हलदरपाडा गावात हा धडक कारवाई करण्यात आली. आलोक पॉल याच्या घरातून सोन्याच्या बिस्कीटांचा साठा जप्त केला.ही सोन्याची बिस्किटे बांगलादेशमधून भारतात आणण्यात आली होती.
जप्त केलेल्या सोन्याचे एकूण वजन 16.067 किलो ग्रॅम वजणाची आहेत. दक्षिण बंगाल फ्रंटियरचे डीआयजी आणि प्रवक्ते एके आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, "25 मे रोजी सीमा चौकी गुणरमथच्या जवानांना हल्दरपाडा गावातील आलोक पॉल याच्या घरात सोन्याची बिस्किटे ठेवली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बीएसएफ जवानांकडून संशयित घराची चारही बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली, त्यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत या घराची झडती घेण्यात आली. तेव्हा घरात कापडाच्या पट्ट्यात लपवून ठेवलेली सोन्याची बिस्किटे मिळाली."
West Bengal: BSF arrests smuggler with gold biscuits worth Rs 12 crore on India-Bangladesh Border
Read @ANI Story | https://t.co/gdqPHxx6wf pic.twitter.com/7OrsuGzMJR
— ANI Digital (@ani_digital) May 26, 2024
चौकशीदरम्यान, आलोक पॉलने उघड केले की मार्च २०२४ रोजी त्यांला ही सोम्याची बिस्कीटे मिळाली."ती घरी लपवून ठेवण्यासाठी तो त्याला दररोज 400 रुपये देईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर अज्ञात तस्कर त्याच्या घरी सोन्याची बिस्कीटे ठेवत होती. अटक करण्यात आलेल्या इसमाला आणि जप्त केलेली सोन्याची बिस्कीटे पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कोलकाता येथील महसूल गुप्तचर संचालक (डीआरआय) यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.