Weather Update Tomorrow: उत्तर भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनने वेग पकडला आहे. दिल्ली एनसीआर आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे, त्यामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. मात्र, दमट उकाड्याने सध्या लोकांना त्रास दिला आहे. उष्णतेचा सामना करणाऱ्या उत्तर भारताला लवकरच दिलासा मिळणार आहे. मान्सून राजस्थानमध्ये दाखल झाला असून उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोहोचला आहे. राजस्थानमध्ये मान्सून दाखल झाल्याने आजूबाजूच्या राज्यांमध्येही मान्सूनपूर्व हालचाली वाढल्या आहेत.
कसे असेल उद्याचे हवमान, जाणून घ्या
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी सांगितले की, 27 ते 30 जून दरम्यान वायव्य भारतात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मान्सून दिल्लीतही २९ जूनपर्यंत पोहोचेल. मान्सून सध्या त्याच्या सामान्य मार्गाच्या तुलनेत सुमारे एक आठवडा उशिराने दाखल होत आहे. 11 जूननंतर तो सुमारे 9 दिवस मंद राहिला.
आयएमडीने म्हटले आहे की, "मान्सूनची उत्तर सीमा मुंद्रा, मेहसाणा, उदयपूर, शिवपुरी, सिद्धी, ललितपूर, चाईबासा, हल्दिया, पाकूर, साहिबगंज आणि रक्सौलमधून जात आहे." IMD ने 28 ते 30 जून दरम्यान उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी, 28 ते 29 जून दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश आणि 29 ते 30 जून दरम्यान हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) अंदाज वर्तवला आहे की 3 जुलैपर्यंत मान्सून पुन्हा देशभरात फिरण्यास सुरुवात करेल आणि संपूर्ण वायव्य भारतात व्यापेल. राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त पंजाब आणि हरियाणा यांचाही यात समावेश आहे.
संपूर्ण देशात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले, 'जुलैच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला चांगल्या पाऊस अपेक्षित आहे आणि जूनपासूनची कमतरता या काळात भरून निघेल.