Weather Podcast Today: भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) उद्याचा म्हणजेच ९ जानेवारीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान अंदाज वर्तवणारी संस्था स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत वायव्य आणि मध्य भारततसेच महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होऊ शकते. पूर्व भारतातही पुढील २४ तासांत तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागात थंडीची लाट येऊ शकते. याशिवाय राजस्थानच्या काही भागात जमिनीवर बर्फाचा प्रभाव (ग्राऊंड फ्रॉस्ट) दिसून येतो. हेही वाचा:
पाऊस कुठे पडणार?
अरुणाचल प्रदेश, पूर्व आसाम आणि नागालँडमध्ये हलका पाऊस पडू शकतो. तर अंदमान-निकोबार बेटांवर एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तामिळनाडूच्या किनारपट्टीवरही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१० जानेवारीपासून नवा विक्षोभ सक्रिय होणार
दरम्यान, 10 जानेवारीपासून वायव्य भारतात एक नवीन पश्चिमी विक्षोभ धडकण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हवामानात आणखी बदल होतील.