'नाट्यगृहाबाहेर आम्हीच बॉम्ब ठेवला'; स्टींगमध्ये 'सनातन'च्या साधकांची कबुली
(संग्रहित प्रतिमा)

'सनातन' या संस्थेचा डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा यापूर्वीच करण्यात आला आहे. या हत्या प्रकरणात सनातनच्या काही साधकांना पोलिसांनी अटकही केली आहे. दरम्यान, याच प्रकरणात 'सनातन'च्या अडचणी वाढल्या आहेत. सनातनच्या दोन साधकांचे 'स्टिंग ऑपरेशन' करण्यात आले. या स्टींगमध्ये या दोन्ही साधकांनी वाशी येथील नाट्यगृहाबाहेर बॉम्ब आणि तसेच स्फोटक पदार्थ ठेवल्याची कबुली दिलीआहे.

इंग्रजी वृत्तवाहिनी असलेल्या 'इंडिया टुडे'ने 'सनातन'संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन केले. या ऑपरेशनदरम्यान, वाशी येथील नाट्यगृहाबाहेर बॉम्ब ठेवल्याची कबुली या साधकांनी दिली आहे. दोन साधकांपैकी एक असलेल्या मंगेश दिनकर निकम याने ही कबुली दिली आहे. मंगेश हा वाशी, पनवेल आणि ठाणे येथील नाट्यगृहाबाहेरील स्फोटातील संशयित आहे. एका नाटकात हिंदू देवीदेवतांचा अपमान करण्यात येत होता. त्यामुळे आपण हे कृत्य केले. मात्र, नाट्यगृहाबाहेर बॉम्ब ठेवण्याइतकाच माझा या प्रकरणात सहभाग होता. नाट्यगृहांबाहेर मी बॉम्ब ठेवला आणि तेथून निघालो, असे मंगेश निकम याने म्हटले आहे. तसेच, २००० पासून आपण ‘सनातन’चे साधक असून, पनवेल येथील आश्रमातही आपण जात होतो. तेथेच आपली इतरांशी ओळक झाल्याचे निकम याने म्हटले आहे.

दरम्यान, हरिभाऊ दिवेकर (वय ५८) यानेनही नाट्यगृहाबाहेरील परिसरात स्फोटके ठेवल्याचे म्हटले आहे. मात्र, दहशतवाद विरोधी पथकाने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याबाबत उल्लेख नसल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच, माझ्या घरातून जिलेटिनच्या कांड्या, डिजिटल मीटर आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले होते, असे त्याने कबूल केल्याचा दावा 'इंडिया टुडे'च्या वृत्तात करण्यात आला आहे.

दरम्यान, २००८मध्ये व नाट्यगृहाबाहेर 'सनातन'ने स्फोट घडवल्याचा दावा करण्यात आला होता. परंतू, 'सनातन'ने मात्र हे आरोप फेटाळून लावले होते.