Viral video PC twitter

viral video: मध्य प्रदेशातील एका कुटुंबाने त्यांच्या पाळीव पोपटासाठी केलेला एक मोहक अंदाजत नेटिझन्सची मने जिंकली आहे. मध्य प्रदेशातील दमोहमधील सोनी कुटुंबाने त्यांचा प्रिय 'मिठू' गमावला आहे आणि जो कोणी त्याला त्यांच्याकडे परत आणेल त्याला 10,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. कुटुंबाने एक पोस्टर लावले आहे ज्यात "मिठू मिसिंग" असे लिहिलेले आहे ज्यात 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. एमपीच्या दमोह जिल्ह्यातील इंदिरा कॉलनीत राहणाऱ्या सोनी कुटुंबाने दावा केला की, गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे पोपट आहे आणि संपूर्ण कुटुंबाला हा पक्षी आवडतो. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.