Photo Credit- X

Vistara Air India Merger: टाटा समूहाने सिंगापूर एअरलाइन्स विस्तारा आणि एअर इंडियाच्या विलिनीकरणापूर्वी(Vistara Air India Merger) कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर दिली आहे. ज्यात पायलट, केबिन क्रू आणि कोणताही परवानाधारक वगळता सर्व ग्राउंड कर्मचारी व्हीएसएस आणि व्हीआरएस या दोन योजनांसाठी पात्र असतील, असे म्हटले आहे.सध्या विस्तारा मध्ये सुमारे 6,500 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, ज्यात कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (हेही वाचा:Vistara Airlines : आता आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्येही मिळणार 20 मिनिटे मोफत वायफाय, 'या' कंपनीनं घेतला मोठा निर्णय)

स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना (VRS) आणि स्वेच्छा विभक्त योजना (VSS) नॉन-फ्लाइंग कायम कर्मचाऱ्यांसाठी ऑफर केली आहे. पात्र कर्मचारी 23 ऑगस्टपर्यंत योजनांसाठी अर्ज करू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला ऑफर केलेल्या योजनांसारख्याच योजना आहेत. पायलट, केबिन क्रू आणि त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी परवानाधारकांसाठी या योजना लागू होणार नाहीत. या योजनांवर विस्ताराकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एअरलाइनने 2015 मध्ये उड्डाण सुरू केली आहेत. (हेही वाचा: Tata-BSNLमध्ये मोठी डील, 4G इंटरनेट मिळणार स्वस्तात, रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर Jio-Airtel ला मोठा झटका)

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि विस्ताराच्या सुमारे 600 नॉन-फ्लाइंग कर्मचाऱ्यांवर या दोन एअरलाइन्सच्या मेगा-विलीनीकरणामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. एअर इंडिया ग्रुपमधील प्रभावित कर्मचाऱ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे टाटा कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

12 मे रोजी, एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कॅम्पबेल विल्सन, विस्तारा सीईओ विनोद कन्नन यांच्यासह, प्रस्तावित विलीनीकरणाबाबत दोन्हींच्या कर्मचाऱ्यांसह दीड तासाची बैठक घेण्यात आली होती. त्या वेळी, विल्सन आणि कन्नन यांनी देखील नवीन संरचनेत विद्यमान कर्मचाऱ्यांची नियुक्ती, गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर नियुक्त केले जातील.

विलीनीकरणानंतर सर्वात मोठी एअरलाइन समूह तयार होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये त्याबाबची घोषणा करण्यात आली होती. सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियामध्ये 25.1 टक्के भागीदारी असेल. विस्तारा ही सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे.

स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना (व्हीआरएस) म्हणजे काय ?

स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना (व्हीआरएस) ही कंपन्यांद्वारे अतिरिक्त कर्मचारी कमी करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आहे. ही पद्धत भारतात अलिकडेच वापरात येऊ लागली आहे. कारण कामगार कायदे संघटित कर्मचार्‍यांच्या थेट कपातीला, छाटणीला परवानगी देत नाहीत. स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना (व्हीआरएस) १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या किंवा ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्याला लागू होते. कंपनीचे किंवा सहकारी संस्थेचे संचालक वगळता, कंपनीचे किंवा प्राधिकरणाचे किंवा सहकारी संस्थेचे कामगार आणि अधिकारी यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांना (मग ते कोणत्याही पदनामाने ओळखले जात असोत) स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू होते.