रविवारी रामनवमीच्या मुहूर्तावर देशातील अनेक राज्यांतून हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. गुजरात, झारखंडपासून पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशपर्यंत अनेक भागात हिंसक चकमकी आणि मिरवणुकांवर हल्ले झाल्यानंतर तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, आता AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पोलीस, हिंदुत्ववादी संघटना आणि धार्मिक नेत्यांवर निशाणा साधला. असदुद्दीन ओवेसी यांनी आरोप केला की, हिंदूवादी संघटनांनी वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचार केला आणि पोलिसांना भडकवले. रामनवमी मिरवणूक आणि रथयात्रेचा वापर अनेक ठिकाणी मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषणे देण्यासाठी केला जात असल्याचे त्यांनी ट्विट केले.
Tweet
In many places RN yatras were used to make hate speeches against Muslims 3/3
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 10, 2022
ते पुढे म्हणाले की, धार्मिक नेते मुस्लिमांच्या नरसंहार आणि बलात्काराबद्दल बोलतात. हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या जमावाने पोलिसांच्या सांगण्यावरून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये वातावरण बिघडवले आहे. रामनवमी आणि त्याच्या काही दिवस आधी राज्यांमध्ये हिंसक घटना समोर आल्या होत्या ज्याचा उल्लेख असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.