MLA D K Shivakumar Beat Voter in Guntur: गुंटूरमध्ये मतदानाला गालबोट; आमदाराने थेट मतदान केंद्रावरच मतदाराच्या कानशीलात लगावली (Watch Video)
Photo Credit - X

MLA D K Shivakumar Beat Voter in Guntur: आंध्र प्रदेश मधील गुंटूरमध्ये मतदानाला गालबोट लागल्याची माहिती मिळत आहे. वायएसआरसीपीचे आमदार डी के शिवकुमार यांनी मतदान केंद्रावर(Polling Station)च मतदाराच्या कानशीलात लगावल्याची(MLA D K Shivakumar Beat Voter) घटना घडली आहे. घटनेवेळी मारहाण झालेला पिडीत मतदार मतदानाच्या रांगेतच उभा होता. दरम्यान, आमदार डी के शिवकुमार यांनी मतदानाची रांग तोडून ते मतदानासाठी पुढे गेले. त्यामुळे मतदाराने त्यावर आक्षेप घेतला. परिणामी, डी के शिवकुमार यांनी त्याला मारहाण केली.

घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. डी के शिवकुमार यांनी मतदाराच्या कानशीलात लगावताच मतदारानेही प्रत्युत्तरात डी के शिवकुमार यांच्या कानशीलात लगावली. मात्र, त्यानंतर आमदारांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मतदाराला जोरदार मारहाण केली. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून मतदाराला मारहाण केल्यामुळे याचा परिणाम तिथल्य़ा लोकप्रतिनीधीच्या मतावर होणान का हे पहावं लागेल. (हेही वाचा:Dharashiv: धाराशिव येथे राजकीय वादातून मतदान केंद्राजवळ चाकू हल्ला, एकाचा मृत्यू )