Thief Snatches Woman’s Phone: जौनपूर मध्ये एक महिला मॉर्निंग वॉक करत असताना एका चोरट्याने तीच्या कडून मोबाईल हिसकावून घेतला. आरोपी घटनास्थळीवरून फरार झाला. या घटने अंतर्गत पोलीसांनी प्रमोद सेठ असं नाव असलेल्या आरोपीला अटक केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. चोरट्या मोबाईल जबरदस्तीने फोन हिसकावत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महिलेच्या मदतीला कोणीतरी येण्याआधी आरोपी व्यक्ती फोन घेऊन फरार झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला घरातून बाहेर पडताच काही वेळानंतर चोरट्याने पाठलाग केला. रस्त्यावर कोणी नसताना त्याने मागून येवून मोबाईल हिसकावला. महिलेने देखील आपल्या मोबाईल वाचवण्याचा बरेच प्रयत्न केले. पंरतू तीला अपयश आले.मदतीसाठी तीनं आवाज देखील दिला. पण कोणीही लवकर आले नाही, कोणीतरी मदतीसाठी येण्याआधीच आरोपीने जबरदस्तीने मोबाईल हिसकावला. घटनास्थळावरून त्याने पळ काढला. ही घटना कॅमेरात कैद झाली.
In UP's Jaunpur, a woman out on morning walk was waylaid by a man, wearing a skull cap, who could be seen snatching chain from the victim and fleeing from the spot. The accused was later identified as Pramod Seth, now under arrest. pic.twitter.com/BABwIutLus
— Piyush Rai (@Benarasiyaa) October 4, 2023
ही सर्व घटना पोलिसांत सांगितली. पोलिसांनी घटनास्थळावरून व्हिडिओ तपासले. आरोपीने ओळख पटू नये म्हणून त्याने टोपी घातली होती. पोलिसांनी अथक प्रयत्न करून आरोपीला ताब्यात घेतले. प्रमोद सेठ असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.