Varanasi Shocker: वाराणसीच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गायघाट परिसरात अंधश्रद्धेबाबत (Superstition) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गायघाट येथे राहणाऱ्या एका पुजाऱ्याला माँ कालीचे दर्शन हवे होते. देवीचे दर्शन न झाल्याने त्याने स्वत:चा गळा कापल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. त्याला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यात त्याचा मृत्यू झाला. (Syria War News Update: बंडखोरांच्या ताब्यातील युद्धग्रस्त सीरियातून 75 भारतीयांची सुटका)
या घटनेनंतर पुजाऱ्याचा आरडाओरडा ऐकून स्वयंपाकघरात असलेल्या त्याच्या पत्नीने पुजाऱ्याकडे धाव घेतली. पूजारी रक्तबंबाळ अवस्थेत होता. पत्नीने पुजाऱ्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत पुजारी अमित शर्मा पत्नी आणि मुलासह गाय घाट परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. मृत पुजारी पर्यटकांना मंदिरे आणि पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये समजावून सांगत असत.(Dausa Borewell Rescue: पाच वर्षांचा मुलगा बोरवेलमध्ये अडकला; बचावकार्य सुरु; राजस्थान येथील घटना)
मिळालेल्या माहिनुसार, पुजारी अमित शर्मा हे पत्नीसह तिसऱ्या मजल्यावर राहत होते. या घटनेनंतर घरमालक सूरज पाल मेहरा यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. तेव्हा त्याच्या घरून ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा माकडाने हल्ला केल्याचे वाटले. नंतर पुजाऱ्याने गळा कापल्याचे समजे असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
पुजारी अमित शर्मा रोज सकाळी मंदिरात जायचे. दुपारी परतल्यानंतर संध्याकाळी पुन्हा मंदिरात आणि पर्यटकांना भेटायला जायचे. पुजारी पूजेसोबतच तंत्र मंत्रातही सहभागी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही घटना घडली आहे. मात्र, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.