आपल्या समाजात आजही मासिक पाळीबद्दल (Menstruation) अनेक गैरसमज आणि चुकीच्या प्रथा आहेत. बायकांना मासिक पाळी आली की त्यांना एका बाजूला बसवणे, स्पर्श न करणे, घरातल्या कोणत्याही वस्तूला हात न लावू देणे असे प्रकार सर्रास घडतात. याचपार्श्वभूमीवर गुजरात (Gujarat) येथील वडोदरा (Vadodara) येथून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या दिवशी एका महिलेला मासिक पाळी आल्याचे तिने सर्वांपासून लपवले म्हणून तिच्या पतीने तिच्याकडे घटस्फोटाची (Divorce) मागणी केली आहे.
वडोदरातील या जोडप्याचे जानेवारी महिन्यात लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या दिवशी पत्नीची मासिक पाळी चालू होती. दरम्यान, तिने याबद्दल कोणालाही न सांगता तिने लग्नातील सर्व धार्मिक विधी पार पाडले. मात्र, मंदिरात जाण्याची वेळ आल्यानंतर पत्नीने याबद्दल आपल्या सासूला सांगितले. तिच्या या वागण्यामुळे आपला विश्वासघात झाला आहे, असा आरोप तक्रारदार व्यक्तीने केला आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh: संतापजनक! सामूहिक बलात्काराची तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेवर पोलीस ठाण्यात बलात्कार
संबंधित व्यक्तीने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या अर्जात पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, त्याच्या पतीने त्याच्याकडे दरमहा 5 हजारांची मागणी केली होती. एवढेच नव्हेतर, घरात एअर कंडिशनर बसवण्याचेही त्याला सांगितले. मात्र, खर्च पडवडणार नसल्याने त्याने एअर कंडिशनरसाठी तिला नकार दिला. यामुळे राग अनावर झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली. त्यानंतर पत्नीला घरी परत आणण्यासाठी त्याने अनेकदा प्रयत्न केले, असे त्याने तक्रारीत म्हंटले आहे.
तसेच, तिच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावाही या संबंधित व्यक्तीने तक्रारीत केला आहे. या प्रकरणात तक्रारदार पतीने पत्नीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्येही फिर्याद दाखल केली आहे. तसेच पत्नीने बापोड पोलीसस्थानकात त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात खोटी तक्रारही दाखल केल्याचा त्याचा दावा त्याने केला आहे.