Uttar Pradesh: विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या 12 वर्षीय मुलीची हत्या, आईच्या प्रियकराला अटक
crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

उत्तर प्रेदशच्या (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) जिल्ह्यातील जैतापूर गावात (Jaitapur Village) एका 12 वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली होती. या हत्येचे गूढ उकलेले असून याप्रकरणी एका व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. आरोपीचे मृत मुलीच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधात मृत मुलगी अडथळ ठरत असल्याने आरोपीने तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर जैतपूर गावातील एका बागेत तिचा मृतदेह फेकून दिला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

कानपूरचे एसीपी केशव कुमार चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले की, गुरुवारी मृत मुलीचा मृतदेह सापडला होता. तिने तिच्या आई आणि आरोपीला आक्षेपार्ह स्थितीत पकडल्यानंतर तिच्या वडिलांकडे तक्रार केली होती. ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात भांडण सुरू झाले होते. यामुळे आरोपीने तिची हत्या केली. मंजलापूर भागातील संदलपूर चौकाजवळून आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. हे देखील वाचा- Telangana: सेल्फी घेणे जीवावर बेतले! एकाच कुटुंबियांतील 3 मुलींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात आयपीसीच्या कलम 302 (खून) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तिला तुरूंगात पाठविण्याच्या प्रक्रियेत आहोत. तपासणी दरम्यान असे निष्पन्न झाले की मुलीच्या आईचा आरोपींशी विवाहबाह्य संबंध आहे. या गुन्ह्यात मुलीच्या आईचा सहभाग होता की नाही? याची चौकशी सुरु केली जाणार आहे. परंतु, तिच्या आईबाबत आतापर्यंत असे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत की जे तिचा गुन्ह्यात समावेश असल्याची पुष्टी देईल. शवविच्छेदनाच्या अहवालात पीडित मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची नोंद झाली आहे.