Uttar Pradesh: 'एका रात्रीत दोनदा Sex'; बायको म्हणाली 'नाको'; नवऱ्याने गळा दाबून केली हत्या
Husband Wife | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील अमरोहा (Amroha District) येथून पोलिसांनी एका 34 वर्षीय व्यक्तीला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. मोहम्मद अन्वर (Mohammad Anwar) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीने एकाच रात्रीत दोन वेळा सेक्स (Sex Twice) करण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने पत्नीची हत्या केली.पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. मोहम्मद अन्वरने पोलिसांसमोर दिलेल्या व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये हत्येची कबुली दिली. पोलिसांना पत्नीच्या हत्येची कबुली देताना मोहम्मद अन्वर याने सांगितले की, सोमवारी रात्री त्याने पत्नीसोबत संभोग (Sexual Intercourse) केला. संभोगानंतर पत्नी झोपी गेली. काही वेळाने त्याला पत्नीसोबत पुन्हा संभोग (Husband Wife Sex) करण्याची इच्छा झाली. त्याने त्यासाठी पत्नीला उठवले मात्र तीने नकार दिला. संभोग करण्यास पत्नीने नकार देताच मोहम्मद अन्वर याचा संताप अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने पत्नीचा गळा दाबला. ज्यात श्वस गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोपी मोहम्मद अन्वरने पोलिसांना दिली.

आरोपी मोहम्मद अन्वर याने पोलिसांना पुढे सांगितले की, पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह एका पॉलिथीन बॅगमध्ये भरला आणि घरापासून सुमारे 50 किलोमटीर दूर अंतरावर नेऊन फेकला. ही घटना घडली त्याच दिवशी त्याने पोलिसांमध्ये तक्रार दिली की, त्याची पत्नी बेपत्ता आहे. (हेही वाचा, Mumbai Crime: आर्सेनिक आणि थॅलियम द्वारे पतीवर विषप्रयोग, पत्नी आणि प्रियकरास हत्येप्रकरणी अटक, मुंबईतील घटना)

दरम्यान, ठाकूरद्वारातील रतुपुरा गावाजवळ पोलिसांना एका महिलेचा मृतदेह बेवारस स्थितीत मंगळवारी आढळून आला. मृतदेह सापडताच पोलिसांनी प्राथमिक गुन्हा दाखल करत तपास करण्यास सुरुवात केली. तसेच, मृतदेहाची छायाचित्रे लगतच्या पोलिस स्टेशनसोबत शेअर केली. मृतदेहाचे वर्णन आणि तपशील जुळताच मुरादाबाद पोलिसांनी अन्वर याला पत्नीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलावले.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी केलेल्या उटलटतपासणीत त्याची भंबेरी उडाली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. अमरोहा येथील रहिवासी असलेल्या पीडित रुखसारचे 2013 मध्ये अन्वरसोबत लग्न झाले होते आणि त्यांना तीन मुले आहेत. अन्वर हा त्याच्या घराच्या तळमजल्यावर बेकरी चालवतो, तर त्याचे कुटुंब पहिल्या मजल्यावर राहते.