
Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये वडिल आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. फक्त 10 रुपयांसाठी एका बापाने आपल्या मुलीचा गळा आवळून हत्या केली आहे. एवढेच नाही तर आरोपी पित्याने मुलीचा मृतदेह अर्धा जाळून घरापासून काही अंतरावर फेकून दिले. सराय ख्वाजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खानापूर गावात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक करून त्याला तुरुंगात पाठवले आहे. (हेही वाचा- नर्सिंगच्या विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या
अश्या प्रकारे केला खून
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मुलगी आपल्या वडिलांसोबत एका नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यात आली होती त्यावेळी तीनं वडिलांकडून नातेवाईकांसमोर १० रुपये मागितले. वडिलांकडे परतीसाठी फक्त १० रुपये होते. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. त्यानंतर मुलीने हट्टच धरला. त्यामुळे मुलीच्या वडिलांना संताप आला. थोड्यावेळाने वडिलाने रागाच्या भरात मुलीचा हात पकडून शेडजवळ घेऊन गेला, आधी शालने गळा आवळून खून केला.त्यानंतर शालीला आग लावून मुलीला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मृतदेह संपुर्ण जाळता न आल्याने आरोपीने अर्ध जळलेला मृतदेह उचलून काही अंतरावरील शेतात जाऊन फेकला. परिसरात लग्न असल्यामुळे लग्नाच्या लगबगीत मुलीकडे कोणाचे लक्ष गेलेच नाही.
मुलगी बेपत्ता असल्याने आई चिंतेत
मध्यरात्री मुलीच्या आईने शोध घेतला आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह शेतात सापडल्याने गावात मोठी बोंबाबोम झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घरात चौकशी केल्यानंकर वडिलांनीच मुलीचा खुन केल्याची माहिती समोर आली. आरोपी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.