Uttar Pradesh Shocker: निष्काळजीपणा! चुकून बंदूकीतून गोळी सुटली अन् थेट महिलेच्या डोक्याला लागली; अलीगढ येथील पोलिस ठाण्यातील थरार
Uttar Pradesh

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अलीगढ (Aligarh) येथील पोलिस ठाण्यात एका पोलिस उपनिरिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला पासपोर्ट पडताळणीसाठी पोलिस ठाण्यात आली होती दरम्यान ही घटना घडली. पोलिस ठाण्यात गेलेल्या महिलेच्या डोक्यात चुकून उपनिरिक्षक मनोज शर्मा यांच्या बंदुकीने गोळी झाडण्यात आली.घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. महिलेवर सद्या रुग्णालयात उपाचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओत दिसल्याप्रमाणे महिला पोलिस ठाण्यात बराच वेळ बसलेली असते. काही वेळाने एक पोलिस अधिकारी आला आणि त्याने उपनिरिक्षकाला बंदुकी दिले. बंदुक साप करत असताना अचानक महिलेवर चुकुन गोळीबार होतो.  महिलेला या घटनेत डोक्याला गोळी लागल्याने ती जमिनीवर पडते. तिला तात्काळ जवाहरलाल नेहरू वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले. (हेही वाचा- बिहार मध्ये पॅरा मेडिकल विद्यार्थ्यांकडे परीक्षेत पास करण्यासाठी डॉक्टरांची शरीरसुखाची मागणी)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी पोलिस घटनास्थळावरून फरार असल्याची माहिती मिळत आहे.महिलेचा पासपोर्ट पडताळणी करणाऱ्या अधिकाऱ्याकडून पैशांसाठी छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर वाद झाला आणि अधिकाऱ्याने तिला गोळ्या घातल्या, असा कुटुंबाचा दावा आहे. निष्काळजीपणामुळे निरीक्षक मनोज शर्मा यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.