Uttar Pradesh News: अंगावर उकळतं पाणी ओतलं, बेदम मारहाण केली; उत्तर प्रदेशमध्ये विवाहबाह्य संबंधांच्या संशयावून जावयाचा छळ
Jail Pixabay

Uttar Pradesh News: पत्नीच्या माहेरी मान मिळेलं, सगळे विचारपूस करतील असे सर्व जावयांना वाटते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एकाला थेट नकर दिसला असेल अशी घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून पत्नीने तिच्या पतीच्या अंगावर उकळत पाणी (Boiling Water)ओतल्याची घटना उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधून समोर आली आहे. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. सासरच्या मंडळींनी त्याला घराच्या गच्चीवर नेऊन बेदम मारहाण केली. त्याचा मोबाईल, बाईकची चावी त्याच्या जवळून खेचून घेतली. मात्र, त्यानंतर पिडीत पतीने पत्निची थेट जेलमध्ये रवानगी केली आहे. आशिष राय असे पिडीत पतीचे नाव आहे. त्यांचे आणि अम्रिता राय यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते.(हेही वाचा : Jharkhand: झारखंडमध्ये दारूच्या नशेत एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींची केली हत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशमधील धोरिया येथे घडली आहे. गोरखपूरपासून 50 किलोमीटरवर असलेल्या धोरियामध्ये हा प्रकार 13 एप्रिल रोजी रात्री उशीरा घडली. रात्री उशीरा आशिष घरात निवांत झोपलेले असताना अम्रिता यांनी त्यांच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने आशिष यांना बेदम माराहण केली. त्यानंतर मारत मारतच आशिषला गच्चीवर घेऊन गेल्यानंतर तिथून खाली धक्का दिला.

सासरवाडीत पोहोचल्यानंतर काही वेळातच पत्नी आणि सासरच्यामंडळींनी आशिष यांच्यासोबत बाचाबाची सुरू केली. आशिष माघारी त्यांच्या घरी जाऊ नयेत यासाठी सासरच्या मंडळींनी त्यांच्या बाईकची चावी आणि मोबाईल खेचून घेतला होता. अनेकदा विनंती करुनही आशिष यांना बाईकीची चावी देण्यात आली नाही. त्यामुळे आशिष यांना सासरवाडीमध्येच रहावे लागले.

दरम्यान, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आशिष यांनी पत्नी अम्रिताला उकळत्या पाण्याचा तो टोप तिच्या बहिणीने दिल्याचे म्हटले आहे. अचानक उकळते पाणी अंगावर पडल्यामुळे आशिष मोठ्याने किंचाळले. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, सासरच्या मंडळींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये त्याच्या डोक्याला दुखापत झाली. मारत मारत गच्चीवरुन नेऊन तिथून खाली धक्काही देण्यात आला. या प्रकरणामध्ये अम्रिता आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध एफआयआर दाखल करुन अम्रिताला अटक करण्यात आली आहे. आशिषला उपचारांसाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.