उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसी (Jhansi) येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका व्यक्तीने दृश्यम चित्रपटाच्या स्टाईलने पोटच्या मुलीची 13 वर्षाच्या मुलीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, याप्रकरणी चौकशी करत असताना पोलिसांना वेगळाच संशय आला. त्यांनी आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने हत्येची कबूली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी झांसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खुशी शुक्ला असे हत्या झालेल्या तरूणीचे नाव आहे. दरम्यान, 25 ऑगस्ट रोजी खुशी एकटीच घरात होती. तर, तिचे वडील अमित शुक्ला व्यवसायिक कामानिमित्त मौराणीपूरला गेले होते आणि तिची आई मामच्या घरी कालपीला येथे गेली होती. परंतु, मौराणीपूर येथून परतल्यानंतर अमित शुक्लाला खुशी बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर अमित शुक्लाने तिला सामुदायिक आरोग्य केंद्रात घेऊन गेला. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. परंतु, शवविच्छेदनाचा अहवालात खुशीचा गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता खुशी आणि तिची सावत्र आई आकांक्षा यांच्यात दररोज किरकोळ कारणांवरून वाद होत असे. यामुळे पोलिसांना वेगळाच संशय आला आणि त्यांनी अमितची कसून चौकशी केली. त्यावेळी आपणच खुशीची हत्या केल्याची अमितने कबूली दिली आहे. हे देखील वाचा- Tamil Nadu: काय सांगता? 17 वर्षांच्या मुलाला पळवून घेऊन गेली 19 वर्षांची मुलगी; लैंगिक शोषण करून लग्न केल्याचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, खुशी आणि आकांशाचे दररोज वाद होत व्हायचा. आकांशाला खुशी सोबत राहण्याची इच्छा नव्हती. यामुळे दुसऱ्या पत्नीच्या दबावातून आरोपीने खुशीची हत्या करण्याचे ठरवले. त्यानुसार आरोपीने आकांशाला कालपी येथे पाठवले. त्यानंतर आरोपीने खुशीला मारहाण करीत तिचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपीने दृश्यम चित्रपटातून आयडिया घेऊन मौराणीपूर येथे निघून गेला. तसेच तिथे गेल्यानंतर अनेक लोकांना भेटला आणि आपण दिवसभर येथेच असल्याचे त्यांना सांगितले, असे आरोपीने जबाबात नोंदवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकांक्षालाही अटक केली आहे.