उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात फक्त 3 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचला आहे. अपघातातील मृत नागरिक पिलीभीत येथील रहिवासी आहेत. सर्वजण वाराणसीतून देवदर्शन करून परतत असताना फुलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारखियांव येथे यांच्या गाडीची आणि ट्रकची भीषण धडक झाली. कार आणि ट्रकमधील धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. सकाळी 7 वाजेच्या सुमारात हा अपघात झाला. (हेही वाचा - Flood In Sikkim: उत्तर सिक्कीम भागात ढगफूटी; अचानक आलेल्या पुरात 23 सैनिक हरवल्याचं वृत्त)
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. या अपघातात फक्त 3 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचला आहे. सध्या या चिमुरड्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
पाहा पोस्ट -
Uttar Pradesh | Eight people lost their lives in an accident between a car and a truck at 7 am today under the Phupur Police Station area in Varanasi. Only a three-year-old child could be saved: Phupur SHO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 4, 2023
दरम्यान वाराणसी जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
8 killed in car accident in Varanasi's Karkhiyav; CM Yogi expresses grief
Read @ANI Story | https://t.co/j0JD5q6ZXy#UttarPradesh#CMYogi#Varanasi#CarAccidentpic.twitter.com/m8LOBgvzDJ
— ANI Digital (@ani_digital) October 4, 2023
दरम्यान या अपघातानंतर परिसरात एक खळबळ उडाली आहे, पघातातील मृत नागरिक पिलीभीत येथील रहिवासी आहे. या शहरात देखील शोक देखील व्यक्त करण्यात येत आहे.