Cat Meat Used for Biryani in Chennai : तुम्ही मागवलेली बिर्याणी (Biryani)ही चिकनची नसून मांजरांची असेल हे तुम्हाला समजल्यास तुम्हाला किती मोठा धक्का बसेल याची कल्पना करा. चेन्नईतील पेरांबूर परिसरातून अशीच एक घटना समोर आली आहे. ‘नारीकुरावर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांचा एक गट मांजरींचे अपहरण करून त्यांना ठार करतात आणि नंतर त्यांचे मांस रेस्टॉरंटमध्ये विकत असल्याचे वृत्त समोर येत आहे. 2018 मध्ये या परिसरात मांजरी हरवण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यातच आता सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओमुळे बिर्याणी बनवण्यासाठी मांजरींच्या मांस(Cat Meat)चा वापर होत असल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.(हेही वाचा:Rajasthan Shocker: कोटामध्ये रील बनवण्याची क्रेझ ठरली जीवघेणी; बंदुकीसह व्हिडिओ शूट करताना तरुणाचा मृत्यू)
पेरांबूर, चेन्नई येथील नारीकुरवारांवर निष्पाप मांजरींचे अपहरण करत असल्याचा दावा लोक करत आहेत. अलीकडे, चेन्नईच्या स्पर टंक रोडवर भटक्या मांजरींना पकडणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आले रात्रीच्या अंधारात तो भटक्या मांजरी पकडत होता. त्या व्यक्तीने मांजरींना दुकानात विकल्याची कबुली दिली.
Innocent cats are been catched for meat by narikuravars in Perambur chennai,These guys are habitual offenders
Shocking to see the footage
Will @chennaipolice_ step in to stop any more innocent been killed @PetaIndia @PFAChennai_ @PTTVOnlineNews @polimernews pic.twitter.com/0AhadtxEon
— Mani (@Manimaestero03) April 30, 2024