UP Students Clear Exam With 'Jai Shri Ram' Answers: उत्तरपत्रिकांवर ‘जय श्री राम’ लिहून 56 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले यूपीचे विद्यार्थी; प्राध्यापक निलंबित
Exam (PC - pixabay)

UP Students Clear Exam With Jai Shri Ram Answers: वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठाच्या फार्मसी विभागाच्या परीक्षेत उत्तरपत्रिकेत ठिकठिकाणी उत्तरांच्या जागी जय श्री राम (Jai Shri Ram) आणि जय हनुमान जी असे लिहिलेले चार विद्यार्थी जवळपास प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 56 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारीवरून पुनर्मूल्यांकन करण्यात आले, तेव्हा सत्य बाहेर आले. या सर्वांच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक माहितीच्या अधिकाराखाली प्रसिद्ध करण्यात आल्या असून फार्मसी संस्थेचे कंत्राटी शिक्षक डॉ. विनय वर्मा आणि डॉ. आशिष गुप्ता यांना निलंबित करण्यात आले आहे.

वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूरच्या फार्मसी विभागाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका तपासताना परीक्षकांना बरोबर उत्तराच्या जागी जय श्री राम पास, जय श्री हनुमान पास करा, अशा आशयाच्या गोष्टी लिहिलेल्या आढळल्या. यानंतरही विद्यार्थ्यांना 52 आणि 34 गुण मिळाले आहेत. (हेही वाचा - UP Bride Called Off Wedding: मुलाला दोनचा पाढा येत नसल्याने मुलीने मांडवातच लग्न मोडले; उत्तर प्रदेशमधील घटना)

या उत्तरपत्रिका बाहेरील शिक्षकांनी तपासल्या असता विद्यार्थ्यांना शून्य आणि चार गुण मिळाले. दोन्ही परीक्षकांनी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन जास्त गुण दिल्याचा आरोप विद्यार्थी नेते दिव्यांशु आणि एमाक सिंग यांनी केला होता. याबाबत त्यांनी पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कुलगुरूंकडे कारवाईची मागणी केली होती. (Mobile Phone Blast: कानपूरमध्ये इअरफोनसह आणि विना हेल्मेट स्कूटर चालवत असताना मोबाईल फोनचा स्फोट; महिलेचा मृत्यू)

शून्य गुण मिळालेल्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांना कंत्राटी परीक्षकांनी पैसे घेऊन 60 टक्क्यांहून अधिक गुण दिल्याचा आरोप करत विद्यार्थी नेत्यांनी जनमाहितीच्या अधिकाराखाली 19 विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नपत्रिकांच्या 58 उत्तरपत्रिका मागवल्या होत्या. त्यांना फक्त चार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, ज्यावर जय श्री राम, हनुमान जी का जयकारा इत्यादी लिहिले होते. असे असतानाही त्याला 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. या प्रकरणी आता उत्तरपत्रिका तपासणाऱ्या दोन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे.