Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशह येथील खुर्जा नगर भागात एका 13 वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मतिमंद असलेल्या मुलीवर आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप मुलीच्या भावाने केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला. परिसरात मोठी चौकशी दरम्यान आरोपीला अटक करण्यात आले आहे.
मुलीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, कन्हैया (३०) याने त्याच्या बहिणीवर बलात्कार केला होता, जी मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. पोलीस अधीक्षक (ग्रामीण), बजरंग बाली चौरसिया यांनी सांगितले की, मुलगी गावात खेळायला गेली असताना ही घटना घडली. गावातील एका ठिकाणी मुलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच, भावाने पोलीस स्टेशन गाठलं.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात धाव घेत आरोपीला अटक केली, असेही त्यांनी सांगितले. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.