UP Suicide News: देशात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी चालते. दरम्यान उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये क्रिकेट सट्टेबाजीत पैसे हरल्यानंतर एका सरकारी शाळेतील शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेटच्या सट्टेबाजीत 16 लाख रुपये हरल्यावर पैसे जमा करण्यासाठी बुकीकडून दबाव आणला जात होता. या दबावाखाली येवून त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने भावाला या सर्व घटनेची माहिती दिली. भावाने बुकीवर गंभीर आरोप केला आहे. त्याच्या भावावर पैशासाठी दबाव आणल्याचे सांगितले.
शिक्षकाच्या आत्महत्ये नंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चंद्रशेखर असं या मृत शिक्षकाचे नाव होते. तो जालोनच्या पिंडारी गावात राहायचा. मृत शिक्षकाच्या भावाने सांगितले की, त्याच्या भावाला सट्टेबाजीचे व्यसन होते. तो आयपीएल सारख्या मोठ्या खेळात सट्टेबाजी लावायचा. अनेक वेळा आधी त्यांने सट्टेबाजी खेळली होती.
त्याच्या भावाने पुढे आरोप केला की शिक्षकाने बेटिंगमध्ये रक्कम गमावल्यानंतर त्याने 16 लाख रुपयांची रक्कम सेटल केली होती आणि बुकी त्याच्यावर पैसे देण्यासाठी दबाव आणत होता. त्याने सांगितले की, रक्कम सेटल झाल्यानंतर त्याने सट्टेबाजी सोडण्याचे सांगिलतले. त्याने आपल्या भावासाठी ही रक्कम दिली. बुकीने गेममध्ये गमावलेल्या रकमेवर व्याजही आकारले आणि व्याजासह रक्कमही घेतल्याचे त्याच्या भावाने सांगितले.
ललितपुर- सरकारी शिक्षक का फांसी पर लटका मिला शव,पुलिस ने शव को पोस्टमार्टम के लिए भेजा,जांच में जुटी कोतवाली पुलिस,सदर कोतवाली क्षेत्र के आजादपुरा का मामला.#Lalitpur
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) October 6, 2023
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शिक्षकाने आत्महत्या केलेल्या घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आत्महत्या केलेल्या शिक्षकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी सांगितले की, "कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला, पंचायतनामा भरून शवविच्छेदनासाठी पाठवला, आगाऊ कायदेशीर कार्यवाही सुरू आहे."