UP Crime: लखनौ येथून एका कंपनीच्या मालकाचा कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा बदलून दोघांनी मालकाचा खासगी व्हिडिओ बनवला. अज्ञात मोबाईल नंबर वरून व्हिडिओ पाठवून त्याच्या कडून खंडणी मागणी केली. या घटनेतून पोलीसांनी दोन आरोपीला अटक केली आहे. प्राइवेट व्हिडिओ शेअर केला जाईल अशी धमकी देत त्याच्या कडून पैसे उकळले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. चोरट्यांनी डीव्हीआर सीटी चोरली होती.मालकाने डीव्हीआर चोरीला गेल्याची पोलीसांत तक्रार केली होती.
लखनौ येथील गोमती नगर एक्स्टेंशनमध्ये एका कंपनीच्या मालकाचा दोन आरोपींनी खासगी व्हिडिओ काढला. ऑफिसमध्ये त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे गपचूप काढून स्पाय कॅमेरे लावले. त्यांनी मालकाचा खासगी व्हिडिओ बनवला. त्याला फेक नंबरने पैसांचा मेसेज आणि व्हिडिओ पाठवला. चोरांनी पैसे उकळण्यासाठी सापळा रचला होता. आरोपींनी मालकाला धमकी देत खंडणी केली. मालकांनी पोलीसांत तक्रार केली. पोलीसांनी कारवाई करत आरोपींना अटक केले.
पोलीसांनी आरोपींना अटक करून खंडणी मागचे गूढ उकलेले. चोरट्यांकडून दोन मोबाईल फोन आणि एक डीव्हीआर सीडी जप्त केली आहे. चोरांनी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने आलोक यादव (30) आणि आशुवेंद्र राजपूत (28) या दोन आरोपींना अटक केली. खंडणी आणि चोरी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.